अरे बापरे! कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या जेवणात सापडलं झुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:14 PM2020-08-11T21:14:49+5:302020-08-11T21:16:33+5:30

अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर त्यांना राहण्याची सोय म्हणून अंबरनाथ येथील एका खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Oh my god The cockroach was found in the meal of a doctor giving service at Kovid Hospital | अरे बापरे! कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या जेवणात सापडलं झुरळ

अरे बापरे! कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या जेवणात सापडलं झुरळ

Next
ठळक मुद्देयाठिकाणी डॉक्टरांना दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाश्ता देखील देण्यात येत आहे. तसेच हा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिले आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अंबरनाथमधील एका खाजगी हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था असून या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. त्यातच जेवणात झुरळ सापडल्याने डॉक्टरांचा संताप अनावर झाला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर त्यांना राहण्याची सोय म्हणून अंबरनाथ येथील एका खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी डॉक्टरांना दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाश्ता देखील देण्यात येत आहे. 


 मात्र, यात जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे या जेवणात झुरळ सापडल्याने याठिकाणी डॉक्टरांनी या ठिकाणच्या जेवणाची व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. तसेच याआधी देखील जेवणामध्ये किडे सापडण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जेवणामध्ये सुधारणा करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. कोविड रुग्णालयातील रुग्णांना जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार येत असताना आता डॉक्टरांच्या देखील जेवनात झुरळ सापडल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी या प्रकरणात डॉक्टरांनी पालिका प्रशासनाने हॉटेल चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र हे प्रकरण बाहेर पडल्याने पालिका प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे ज्या डॉक्टरांनी जेवणाबाबत तक्रार व्यक्त केले त्या डॉक्टरांनाच नोटीस बजावण्याचे काम पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये आणखीनच नाराजी पसरली आहे. या प्रकरणानंतर संबंधित हॉटेल्स संचालकाला तंबी देण्यात आली आहे. तसेच हा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

 

सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद 

Web Title: Oh my god The cockroach was found in the meal of a doctor giving service at Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.