शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांत आता तासिका शिक्षक

By admin | Updated: October 30, 2015 23:30 IST

आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आता पालिकेने तासिका शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला आहे

ठाणे : आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आता पालिकेने तासिका शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला असून त्यांना तासिकेला ६० रुपये याप्रमाणे मानधन दिले जाईल.ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या १० माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये आजच्या घडीला २०१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साधारणपणे प्राथमिक शाळेतील प्रत्येक तुकडीत सुमारे ६० विद्यार्थी व माध्यमिक शाळेत सुमारे ७० विद्यार्थी आहेत. आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार इयत्ता १ ली ते ५ वीची आवश्यक पटसंख्या ३० असून इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतची पटसंख्या ३५ आहे. तसेच इयत्ता ९ वी व १० वीसाठी कमाल पटसंख्या ४५ असणे आवश्यक आहे. हा अहवाल विचारात घेता ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळा आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार विहित केलेल्या पटसंख्येनुसार जास्त विद्यार्थी संख्या असल्याने मुलांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून गुणवत्ता विकास करण्याकरिता तसेच महापालिकेतील सेवानिवृत्त शिक्षकांची तासिका तत्त्वावर सेवा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.