शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

कुख्यात गँगस्टर छोटा शकीलच्या बहिणीचा मुंब्य्रात मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 8:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा हस्तक गँगस्टर महंमद शकील बाबुमियाँ शेख उर्फ छोटा ...

ठळक मुद्देश्वसनाचा झाला होता त्रासकोरोनाचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा हस्तक गँगस्टर महंमद शकील बाबुमियाँ शेख उर्फ छोटा शकील याची बहिण हमीदा फारुख सय्यद (५०, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) हिचा सोमवारी रात्री मृत्यु झाला. तिच्या मागे पती फारुख एक अविवाहित मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.अमृतनगरच्या शादीमहल रोडवरील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर सय्यद कुटूंबीय वास्तव्याला आहे. हमीदाला गेल्या दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता. सोमवारी तिला हा त्रास अधिक प्रमाणात जाणवला. त्यानंतर ह्दयविकाकाराने १५ जून रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तिचा घरातच मृत्यु झाला. तिच्या पार्थिवाला १६ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा, अमृतनगर येथील दर्गा रोडवरील कब्रस्थानात दफन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.फारुख हा आजारी असल्यामुळे तो कोणताही कामधंदा करीत नाही. मुंब्रा येथे त्याचा एसटीडीचा टेलिफोन बूथ होता. अलिकडे तो नेरुळ येथे काही बांधकामे करीत होता. हमीदाला श्वसनाचा त्रास झाल्यामुळे तिचा मृत्युही कोरोनामुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यास कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तसेच तिची कोरोनाची तपासणीही झालेली नव्हती, अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.* १९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम कासकर याचा उजवा हात समजला जाणारा त्याचा खास हस्तक छोटा शकील याच्यावरही बॉम्ब स्फोटासह बडया व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणे, खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि ठार मारण्याची धमकी देणे असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षांपासून तो पाकिस्तानातील कराची तसेच इतर वेगवेगळया देशांमध्ये वास्तव्याला असल्याचे बोलले जाते.* छोटा शकीलची मीरा रोड येथे राहणारी लहान बहिण फहमिदा हिच्या मृत्यूला महिना उलटण्यापूर्वीच आता मोठी बहिण हमीदा हिचाही मृत्यु झाला आहे. छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा ही दुसऱ्या क्रमांकाची बहिण होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र