शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

आयुक्त, सत्ताधा-यांमध्ये असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:49 AM

मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते सत्ताधाºयांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता यांच्यापासून ते प्रभाग सभापतींपर्यंत सर्वांनी आपली दालने शुक्रवारपासून बंद करून निषेध व्यक्त केला.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते सत्ताधाºयांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता यांच्यापासून ते प्रभाग सभापतींपर्यंत सर्वांनी आपली दालने शुक्रवारपासून बंद करून निषेध व्यक्त केला.पालिकेत भाजपाची सत्ता येताच आयुक्त व सत्ताधाºयांमध्ये कामातील अनियमिततेमुळे शीतयुद्ध सुरू झाले. जेसल पार्क नाल्याच्या कामात तर निविदा काढण्यापूर्वीच सत्ताधाºयांच्या मर्जीतील राहुल व्यास या कंत्राटदाराला कार्यादेश दिला. तीन कोटीच्या या कामाला मूळ कंत्राटदाराऐवजी उपकंत्राटदाराने कामाला सुरूवात केली. सत्ताधाºयांमधील एका नेत्याच्या भव्य गृहप्रकल्प बांधकाम परवानगीवर आयुक्तांऐवजी एका अधिकाºयाची स्वाक्षरी करण्यात आली.काही महिन्यांपूर्वी सुमारे ९५ कोटींच्या नाला बांधकामाच्या निविदा वेगवेगळ्या न काढता या मोठ्या कामाची एकच निविदा काढली. यात बेकायदा असल्याची तक्रार आल्यानंतर राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली. मात्र ती, स्थगितीच्याच दिवशी पुन्हा उठवली.सत्ताधारी व प्रशासनातील काही बेकायदेशीरपणाचा पाढा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाचला जाऊ लागला. कालांतराने आयुक्तांनी बेकायदेशीर कामांना असहकार करण्यास सुरूवात केली. दोन दिवसांपूर्वी सत्ताधाºयांनी पालिकेतील काही अधिकाºयांची बैठक बोलवली होती. त्यात यंदाच्या पालिका वर्धापनदिनाचा कार्यक्रम जल्लोषात करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्यासाठी प्रशासनाने केवळ ५ लाखांची तरतूद केल्याने ती सुमारे १ कोटीपर्यंत नेण्याची सूचना अधिकाºयांना करण्यात आली. परंतु, पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने वाढीव निधी कसा काय उभा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. अशातच आयुक्त महापौरांच्या बैठकीला हजर राहत नसल्याने आयुक्तांविरोधात सत्ताधाºयांमध्ये रोष निर्माण झाला.आयुक्त सत्ताधाºयांना जुमानत नसल्याचा कांगावा करत त्याच्या निषेधार्थ महापौरांसह उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृहनेते रोहिदास पाटील, प्रभाग समिती सभापती जयेश भोईर, डॉ. राजेंद्र जैन, गणेश शेट्टी, संजय थेराडे, अश्विन कासोदरिया, आनंद मांजरेकर यांनी आपापले दालने बंद केली आहेत. सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.