शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक होण्याचे निखिलचे स्वप्न अधुरेच

By admin | Updated: December 8, 2015 00:49 IST

‘‘निखिल अभ्यासात खूप हुशार होता. त्याला पदवीनंतर सैन्यात भरती व्हायचे होते. देशसेवा करायची होती. भारतमातेअगोदर तो जन्मदात्या आईला वाचवायला गेला

मुरलीधर भवार,  डोंबिवली‘‘निखिल अभ्यासात खूप हुशार होता. त्याला पदवीनंतर सैन्यात भरती व्हायचे होते. देशसेवा करायची होती. भारतमातेअगोदर तो जन्मदात्या आईला वाचवायला गेला, पण आईही वाचली नाही आणि हाताशी आलेला मुलगाही गेला. माझ्या जगण्याचा आधार गेला. आता मी आणि माझी मुलगीच कुटुंबात उरलो आहोत... सांगा कुणासाठी जगायचं?... भोपर येथे खदाण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाच्या कुटुंबाचे प्रमुख हितेंद्र अंजारा यांचा हा आर्त सवाल काळीज गलबलून टाकत होता. त्यांच्या सांत्वनासाठी आलेले मित्र-नातलगही या कोलमडून पडलेल्या कुटुंबाला धीर देताना हळहळत होते. भोपर-देसलेपाड्याच्या खदाण दुर्घटनेनंतर निखिलच्या घरी लोकमतचे प्रतिनिधी गेले, तेव्हा हितेंद्र अंजारा निखिलच्या कॉलेजची बॅग पाहत हताश बसून होते. त्याचे काही फोटो शोधत होते. निखिल हा आर.टी. बोस कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाला होता. त्याच्यासह त्याच्या आईच्या मृत्यूची माहिती मिळताच कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे त्याचे मित्र-शिक्षकांनी दुपारी निखिलच्या घरी धाव घेतली. त्याच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचे वडील हितेंद्र अशोका शॉपिंग सेंटरमध्ये कामाला आहेत, तर आई प्रमिला मुंबईत नेव्हीच्या रुग्णालयात कामाला होत्या. या चौकोनी अंजारा परिवारावर रविवारी काळाने झडप घातली. हितेंद्र हे मूळचे गुजरातचे असले तरी त्यांचा जन्म मुंबईचा. गेली अनेक वर्षे ते भायखळा येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वी भोपर देसलेपाडा येथील श्री समर्थकृपा चाळीत त्यांनी साडेसहा लाख देऊन घर घेतले. कामावर जाण्यापूर्वी सवयीने प्रमिला सर्व कामे उरकून जात. शनिवारी पाणी न आल्याने कधी नव्हे ते त्या खदाणीवर गेल्या आणि त्यांना सोबत म्हणून गेलेला निखिल आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. - संबधित वृत्त/४