शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवी २७ हजार बेकायदा बांधकामे

By admin | Updated: February 3, 2016 02:15 IST

कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचिका दाखल झाल्यापासून शहरी भागात आत्तापर्यंत २६ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचिका दाखल झाल्यापासून शहरी भागात आत्तापर्यंत २६ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये गेल्या काही दिवसांत एक हजारपेक्षा जास्त बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना परवानगी देण्यास न्यायालयाने निर्बंध घातले असतानाही आदेश धाब्यावर बसवून बांधकामे सुरु आहेत.बेकायदा बांधकामातून महापालिकेला एक पैशाचे उत्पन्न मिळत नसल्याने सुमारे३ हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होती. त्यांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळत नसल्याने ही गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली. २००२ साली २७ गावे महापालिकेतून वगळली त्यावेळी २७ गाव परिसरात १० हजार बेकायदा बांधकामे होती. ही गावे महापालिकेतून वगळल्यानंतर त्याठिकाणच्या बेकायदा बांधकामावर जिल्हा परिषद प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. २७ गावे २००६ पासून एमएमआरडीए कार्यक्षेत्रात आल्याने एमएमआरडीएने २७ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. हा आराखडा मंजूर होण्यास डिसेंबर २०१४ साल उजाडले. सध्या ही गावे महापालिकेत असली तरी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा एमएमआरडीएकडेच आहे. या सगळ््या घोळामुळे बेकायदा बांधकामे बेधडकपणे उभारली गेली. तळ अधिक चार, पाच, सहा, सात आाणि आठ मजल्याच्या बेकायदा इमारती आजदे, सांगर्ली, सागाव, कोपर, नांदिवली, देसलेपाडा आदी परिसरात उभारल्या आहेत. एमएमआरडीएने कोणालाही परवानगी दिलेली नसल्याने बेकायदा बांधकामे उभी कशी राहिली असा प्रश्न आहे. एका बेकायदा इमारतीत २५ ते ३० सदनिका असतात. त्याची नोंदणी उपनिबंधकांकडे केली जाते. ती कशाच्या आधारे केली जाते. रेती उपसा करण्यावर सरकारीची बंदी आहे. बेकायदा रेती उपसा केला जात आहे. रेती सात हजार ब्रास व माती चार ते पाच हजाराला एक ट्रक या दराने विकली जाते. परिणामी सरकारी महसूल बुडतो. महिनाभरापूर्वी बेकायदा दुकानांच्या गाळ््यांना जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सील ठोकले होते. त्यानंतर त्यांनीच हे सील पुन्हा उघडले. बेकायदा बांधकाम प्रकरणाचे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा महापालिकेने सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याची माहिती न्यायालयास सादर केली होती. त्यानंतर बेकायदा बांधकामे होऊ द्यायची नाही, असे न्यायालयाने महापालिका प्रशासनास बजावले होते. दरम्यानच्या काळात ९ हजार बेकायदा बांधकाम केल्याची माहिती पुराव्यासह न्यायालयास सादर केली. आजमितीस त्यात आणखीन वाढ झाली आहे. किमान २६ हजार बेकायदा बांधकामे महापालिका क्षेत्रात नव्याने झाली आहेत. समिती पे समिती सुरूच ठाणे जिल्हयातील बेकायदा बांधकाम प्रकरणी अग्रवाल समिती स्थापन करण्यात आली होती. त्याआधी काकोडकर समिती, नंदलाल समिती आणि नांगनुरे समितीने बेकायदा प्रकरणी राज्य सरकारला अहवाल सादर केले होते. समितीने दोषी ठरविलेल्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. उच्च न्यायालयाने अग्यार समिती नेमली होती. या समितीने न्यायालयास अहवाल सादर केला आहे. हा अहवाल उघड करण्याची मागणी याचिकाकर्ते गोखले यांनी न्यायालयाकडे होती. तो अहवालही उघड करण्यात आलेला नाही.