कल्याणमध्ये अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बंद दाराआड चप्पल मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 16:28 IST2019-11-23T16:27:48+5:302019-11-23T16:28:27+5:30
राज्याच्या सत्ता समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कल्याणमध्ये अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बंद दाराआड चप्पल मारो आंदोलन
कल्याण: राज्याच्या सत्ता समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठीत खंजिर खुपसला पक्षाने पक्षाचे नेते शरद पवार यांचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे अजित पवार यांच्या विरोधात चप्पल आंदोलन करण्या ऐवजी बंद दाराआड हे आंदोलन करण्याचे कारण काय असा प्रश्न राष्ट्रवादी सह राष्ट्रवादीच्या मित्र पक्षाकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे आज कल्याण-डोंबिवली महापालिका कार्यालयास ४ थ्या शनिवार निमित्त कार्यालयीन सुट्टी आहे. या सुट्टीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेता दालनात दार बंद करून अजित पवार यांच्या फ्लेक्स बॅनर चपला मारण्यात आल्या. या बॅनरवर गद्दार हे दोन शब्द लिहिले होते दार बंद करून हे आंदोलन केल्याने हे आंदोलन सुद्धा चर्चेचा विषय ठरले आहे . महापालिकेला सुट्टी असताना झालं उघडे कसे करून दिले आणि महापालिकेच्या आवारात असलेल्या दालनात आंदोलन करता येते का ? त्याला कोणी परवानगी दिली असे विविध प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.