शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

ठाणे पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी नगरसेवकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 4:06 PM

आयुक्त हे सत्ताधार्‍यांचे एजंट असल्यासारखे काम करतात; आनंद परांजपे यांचा आरोप

ठळक मुद्देआयुक्त हे सत्ताधार्‍यांचे एजंट असल्यासारखे काम करतात; आनंद परांजपे यांचा आरोप

ठाणे : अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत नाही. तसेच, दूषित पाणीपुरवठा प्रकरणी स्टेमच्या अधिकार्‍यांवरील कारवाई, स्मशानातील भ्रष्टाचार, लसीकरणातील दुजाभाव, नगरसेवकांची कामे  या प्रकरणी ठाणे पालिका आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्लायांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातच आंदोलन केले. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सत्ताधार्‍यांचे एजंट असल्याचा आरोप शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. तर, आर्थिक कारण पुढे करुन पालिका आयुक्त नगरसेवकांची कामे रखडवित असतील तर कोविड व्यतिरिक्त इतर मोठे प्रकल्प जागेवर जाऊन रोखू, असा इशारा शानू पठाण यांनी दिला. 

ठाणे शहरात सध्या प्रशासनाची मनमानी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये नगरसेवकांची कामे रखडविण्यात आलेली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांच्याा प्रभागातच लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सबंध शहरात पूरस्थिती आलेली असताना कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पंचनामे करण्यात आलेले नाहीत. स्टेममधून होणार्‍या दुषित पाणी पुरवठ्याबाबतचे पुरावे सादर करुनही कारवाई करण्यात आलेली नाही. स्मशान आणि दफनभूमीमध्ये ठेकेदारांकडून भ्रष्टाचार सुरु आहे. त्याचेही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांकडून कारवाई होत नसल्याचे सांगत संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठामपा मुख्यालयााच्या प्रवेशद्वारातच धरणे आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी ठाणे पालिकेच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार की नाही? ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळणार्‍या स्टेमच्या अधिकार्‍यांवर कारवाई कधी करणार? स्मशानातही भ्रष्टाचार करणार्‍या ठेकेदारांना जेलमध्ये कधी टाकणार?  लसीकरणातील भेदभाव कधी संपणार? हे प्रश्न विचारणारे फलक नगरसेवकांनी हातात घेतले होते. 

यावेळी शहारध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे पालिका प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला. "लसीकरण हे ठामपाच्या अधिपत्याखाली होणे गरजेचे असताना शिवसेनेच्या शाखांमधून ते करण्यात येत आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मागणी करुनही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाही, एकूणच पालिका आयुक्त शिवसेनेचे एजंट असल्यासारखेच काम करीत आहेत. स्टेममधून नागरिकांना दूषीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर, स्मशानांमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन कसूर करीत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जर या प्रश्नांवर तोडगा काढला नाही. तर ठाणे पालिका मुख्यालयासमोर सबंध राष्ट्रवादी काँग्रेस उग्र आंदोलन छेडेल," असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला. 

प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोपविरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे शहरात सध्या प्रशासनाची मनमानी सुरु असल्याचं म्हटलं. "अशा स्थितीमध्ये नगरसेवकांची कामे रखडविण्यात आलेली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातच लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सबंध शहरात पूरस्थिती आलेली असताना कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पंचनामे करण्यात आलेले नाहीत. स्टेममधून होणार्‍या दुषित पाणी पुरवठ्याबाबतचे पुरावे सादर करुनही कारवाई करण्यात आलेली नाही. स्मशान आणि दफनभूमीमध्ये ठेकेदारांकडून भ्रष्टाचार सुरु आहे. त्याचेही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे आगामी आठ दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महासभेसमोर आंदोलन करुच शिवाय, आर्थिक स्थिती नसल्याचे कारण सांगून जर नगरसेवकांची कामे अडविली जात असतील तर मोठेमोठे प्रकल्प आम्ही बंद पाडू," असा इशारा दिला. दरम्यान, आयुक्तांनी आंदोलनकर्त्या नगरसेवकांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे