शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ठाण्यात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 03:09 IST

२०० कार्यकर्ते नजरकैदेत : पोलिसांना चकवून दीड हजार जण रेल्वेने रवाना

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याने ठाण्यातून हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल होणार होते. परंतु, यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, विविध ठिकाणांवरून सुमारे चार हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले होते. तसेच मुंबईच्या हद्दीवर नाकाबंदीही केली होती. परंतु, राष्टÑवादी कार्यकर्त्यांच्या हे आधीच लक्षात आल्याने सुमारे १५०० कार्यकर्ते सकाळीच रेल्वेने मुंबईला रवाना झाले होते. दुपारनंतर वातावरण निवळल्याने या सर्व कार्यकर्त्यांना नजरकैदेतून सोडून देण्यात आले.काही दिवसांपासून शरद पवार यांच्याविरोधात ईडीकडून दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर स्वत: पवारच शुक्रवारी या कार्यालयात हजेरी लावणार होते. मात्र, त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. असे असतानाही ‘या वेळेस आम्हाला माफ करा, तुमचे आम्ही ऐकणार नसून ईडीच्या कार्यालयाजवळ हजर राहू,’ असे टिष्ट्वट राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी सायंकाळी केले होते.यामुळे ईडी कार्यालयाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये आणि सुरक्षेचा उपाय म्हणून ठाणे पोलिसांच्या वतीने पहाटेपासूनच मुंबईच्या दिशेने जाणाºया ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नाकाबंदी केली होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्टÑवादीच्या ठाणे शहर कार्यालयातून शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांच्यासह १५ ते २० पदाधिकारी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार तेवढ्यात कार्यालयाबाहेरच नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.४० बसची केली होती सोयदुसरीकडे मुंबईसाठी रवाना होण्यासाठी गुरुवारीच राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत शुक्रवारची रणनीती निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे शहर, कळवा आणि मुंब्य्रातून तब्बल ४० बस मुंबईला जाणार होत्या. यातून महिला कार्यकर्त्यांसह तब्बल दोन हजार पदाधिकारी मुंबईला रवाना होणार होते. मात्र, कळव्यातील आत्माराम पाटील चौकातच पोलिसांनी या बस पिटाळून लावल्या. तसेच शहरात असलेल्या बसही पिटाळल्या. परंतु, पोलीस अशा पद्धतीने कारवाई करणार हे माहीत असल्यानेच राष्टÑवादीचे सुमारे १५०० तरुण कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने सकाळीच रेल्वेने रवाना झाले होते. दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर ठाणे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडल्याचे दिसून आले. दुसरीकडे नौपाडा, कळवा, कोपरी, मुंब्रा आदींसह इतर पोलीस ठाण्यांतून सुमारे १५० ते २०० पदाधिकाºयांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. अखेर, पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि वातावरण शांत झाल्यानंतर या पदाधिकाºयांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस