शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

प्रोटोकॉलच्याच्या नावाखाली ठाणे जिल्ह्यातील भाजपा - शिवसेनेचा कुलगी तुरा !

By सुरेश लोखंडे | Published: January 10, 2019 7:57 PM

सिध्दगडवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड तालुक्यातील सुमारे ४० कोटी खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. स्थानिक खासदार कपील पाटील व आमदार म्हणून कथोरे यांना निमित्त मिळणे अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रामात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापास अनुसरून कथोरे यांनी त्या दिवशी सकाळीच उद्घाटन उरकून घेत पालकमंत्र्यांच्या सिध्दगडावरील सलामीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. उद्घाटन स्थळी गेल्यावर निदर्शनात आल्याचे पालकमंत्र्यांनी हसत हसत या विषयावरील चर्चात स्पष्ट केले

ठळक मुद्दे माझा खासदार म्हणून हक्क भंग झाल्याची जाणीव करून देण्यात आलीपालकमंत्र्यांच्या कार्यक्रामात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे जिल्हा परिषदेत काय राजकारण सुरू आहे, चार चार महिने त्यांच्या फाईलवर स्वाक्षरी का होत नाही

सुरेश लोखंडेठाणे : मुरबाड तालुक्यात ४० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्यांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पण त्या आधीच सकाळी अंधारात भाजपाचेआमदार किसन कथोरे यांनी उरकून घेतल्याचे त्यांनी उद्घाटन स्थळी गेल्यावर कळले. प्रोटोकॉल पाळला जात नसल्याच्या संतापातून उद्घाटन उरकून घेतल्याचे वास्तव उघड झाले. पालकमंत्र्यांनी हसत हसत हा विषय हाताळला. पण चार वर्षातील प्रोटोकॉल पाळलच्या नावाखाली जिल्ह्यात भाजपा - शिवसेनेचा कलगी तुरा शनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत दिसून आला.सिध्दगडवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड तालुक्यातील सुमारे ४० कोटी खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. स्थानिक खासदार कपील पाटील व आमदार म्हणून कथोरे यांना निमित्त मिळणे अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रामात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापास अनुसरून कथोरे यांनी त्या दिवशी सकाळीच उद्घाटन उरकून घेत पालकमंत्र्यांच्या सिध्दगडावरील सलामीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. उद्घाटन स्थळी गेल्यावर निदर्शनात आल्याचे पालकमंत्र्यांनी हसत हसत या विषयावरील चर्चात स्पष्ट केले. पण हा विषय गांभीर्याने घेत कथोरे यांच्यासह खासदार कपील पाटील यांनी प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची जाणीव पालकमंत्र्या करून देत तीव्र नाराजी व्यक्त केली.केंद्र व राज्य शासनाच्या आधीवेशन काळात कोणतेही उद्घाटन कार्यक्रम करता येत नसल्याचे पाटील यांनी शासन परिपत्रकच सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. तरी देखील माझ्या मतदार संघात उद्घाटन घेण्यात आले. या कार्यक्रमामुळे माझा खासदार म्हणून हक्क भंग झाल्याची जाणीव करून देण्यात आली. तर मतदार संघात पालकमंत्री येणार असल्याचे कळल्यावर मला आनंदच झाला असता. पण तसे होत नसल्याचे कथोरे यांनी सांगितले. मला कळवले असते तर उद्घाटन स्थळी मी गर्दीही गोळा केली असते. या चार पाच कोटींच्या कामांचे नव्हे तर ४०० ते ५०० कोटींच्या कामांचे उद्घाटन मी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले असते. तसे तीन - चार रस्ते माझ्याकडे आजही आहे. आपण सत्तेत असून तेथे (मुरबाडला) आपली युती असल्याचे कथोरे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.जिल्हा परिषदेतील शिवसेना - राष्ट्रावादीच्या सत्तेस अनुसरून बोलताना कथोरे म्हणाले जिल्हा परीषदेत तुमची आघाडी आहे. पण मुरबाडला आपली युती आहे, अशी पालकमंत्र्याना आठवण करून दिली. राष्ट्रावादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे नाव न घेता ते म्हणाले जिल्हा परिषदेमधील तुमच्या मित्राने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी तुम्ही नाही आले तरी चालेल, उद्घाटन करून घेऊ, आमची ठेकेदारी चालली पाहिजे असे सांगितले, पण साहेब मुरबाडचे ते डांबर आता मी ठेवले नाही, कधी बदलले आहे आणि तसे झाले तर आपल्या तोंडाला काळीमा लागेल, असेही कथोरे यांनी संतापाने सभागृहात सांगितले.तसे माझ्या डोक्यात नाही, काम करायचे आणि लोकाना त्याचा कसा फायदा होईल हे बघायचे , पत्रिकेवर सर्व खासदार आमदाराचे नावे होते. मला वाटले सिध्दगडच्या कार्यक्रमास सर्वच येणार म्हणून मी कोणाशीच संपर्क साधला नाही. मी खाली आल्यानंतर तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. असे पालकमंत्र्यानी स्पष्ट करून या पुढे सर्वच खासदार, आमदारांचा प्रोटोकॉल पाळण्याचे निर्देश त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. या आधीही पाटील यांच्या कथोरे यांनी जिल्हा परिषदेमध्ये फाईलवर स्वाक्षरी होत असल्यीची गंभीर चर्चा केली. जिल्हा परिषदेला आपण डीपीसी पैसा देते, जिल्हा परिषद हे एजेंशी आहे. विकासाचे काम त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे. पण चार चार महिने त्यांच्या फाईलवर स्वाक्षरी का होत नाही. जिल्हा परिषदेत काय राजकारण सुरू आहे, असेही पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून देत भाजपाची आडवणुकीची जाणीव करून दिली.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाMLAआमदार