पाचशे रुपयांसाठी भंगारविक्रेत्याची हत्या, मित्रानेच केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:04 IST2018-11-14T05:03:30+5:302018-11-14T05:04:07+5:30

मित्रानेच केले कृत्य : आरोपीस अटक

The murder of a vendor, for five hundred rupees, was done by a friend | पाचशे रुपयांसाठी भंगारविक्रेत्याची हत्या, मित्रानेच केले कृत्य

पाचशे रुपयांसाठी भंगारविक्रेत्याची हत्या, मित्रानेच केले कृत्य

डोंबिवली : पाचशे रुपये मागितल्यामुळे झालेल्या वादातून भंगारविक्रेता दीपक चौहान (१९) याची हत्या त्याच्याच मित्राने केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी बादशाह खानला अटक केली असून, कल्याण न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोनारपाडा येथील चौहान हा भंगार वेचून उपजीविका करत होता. शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या दीपकचा मृतदेह रविवारी सकाळी नेकणीपाडा येथे हातगाडीवर आढळला होता. शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली होती. त्याचा मृतदेह एका प्लास्टीकच्या गोणीत भरून भंगार जमा करण्याच्या गाडीवर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात हत्या करणारा आढळून आला होता. हत्या केल्यानंतर बादशाह हातगाडीवर काहीतरी वस्तू ठेवून जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी बादशाहला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान बादशाहनेच दीपकची हत्या केल्याची कबुली दिली. दीपकने बादशाहकडे पाचशे रुपये मागितले होते. मात्र, त्यास बादशाहने नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून त्याने दीपकची हत्या केली.
 

Web Title: The murder of a vendor, for five hundred rupees, was done by a friend