शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीसाठी पालिका कर्मचारी जाणार घरोघरी

By admin | Updated: November 15, 2016 04:32 IST

कर्मचाऱ्यांनी थकीत करदात्यांच्या घरी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. गीते यांनी दिले आहेत.

भार्इंदर : कर्मचाऱ्यांनी थकीत करदात्यांच्या घरी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. गीते यांनी दिले आहेत. थकीत मालमत्ताकरासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्तांनी रविवारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या तीन दिवसांत पालिकेने सुमारे १० कोटी मालमत्ताकर वसूल केला असला तरीही अद्यापही अनेक करदात्यांनी थकीत करासह चालू आर्थिक वर्षातील कर पालिकेत जमा केला नसल्याचे समोर आले आहे. यात मोठ्या थकबाकीदारांचा समावेश अधिक आहे. सकाळी १० ते रात्री, मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या करवसुलीला करदाते चांगला प्रतिसाद देत असले तरी अपेक्षित वसुली होत नसल्याचे समोर आले आहे. सरकारच्या आदेशानुसार या कराच्या वसुलीसाठी जुन्या हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी पालिकेला १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याने हा कर वसूल करण्यासाठी सुटीच्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करवसुली सुरू राहणार असल्याने सर्व थकबाकीदारांसह चालू वर्षातील कराचा अद्याप भरणा न केलेल्यांनी कर जमा करण्यासाठी, त्यांना आवाहनाच्या माध्यमातून प्रवृत्त करण्याचे निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार, त्यांनी कर्मचाऱ्यांनी थेट थकबाकीदारांच्या दारी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या थकबाकीदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनी व मोबाइलवर संपर्क साधण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)