Mumbra Hospital Fire: माणुसकीची खिडकी! रमजानच्या नमाजासाठी उठला होता; खिडकीतून आग पाहिली आणि मदतीला धावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:51 PM2021-04-28T14:51:36+5:302021-04-28T14:58:26+5:30

Prime Hospital Fire: मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. परंतु यामध्येही मुंब्य्रातील वकील फरहान अन्सारी हा देवदूत ठरला आहे.

Mumbra Hospital Fire: Lawyer Farhan Ansari helping corona Patient who choked in Prime Hospital Fire | Mumbra Hospital Fire: माणुसकीची खिडकी! रमजानच्या नमाजासाठी उठला होता; खिडकीतून आग पाहिली आणि मदतीला धावला

Mumbra Hospital Fire: माणुसकीची खिडकी! रमजानच्या नमाजासाठी उठला होता; खिडकीतून आग पाहिली आणि मदतीला धावला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. परंतु यामध्येही मुंब्य्रातील वकील फरहान अन्सारी हा देवदूत ठरला आहे. रु ग्णालयाजवळ राहणारा अन्सारी रमजान असल्याने पहाटे नमाज अदा करण्यासाठी उठला असता त्यांनी आपल्या घराच्या खिडकीतून रु ग्णालयाला लागलेल्या आगीच्या लाटा पाहिल्या व तातडीने त्याने भावासह रु ग्णालय गाठले. त्याने रु ग्णालयाच्या मागे जाऊन वॉर्ड मधील भिंतीच्या खिडकीच्या रॉड ने ग्रील तोडून ९ रु ग्णांना तातडीने बाहेर काढले व त्यांचा आगीतून जीव वाचवला व इतर सहका:यांच्या सोबत रु ग्णालयात असलेले ऑक्सिजनचे ३५ सिलेंडर देखील बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळला. त्यामुळेच फरहान या रु ग्णासाठी रमजानच्या पवित्र महिन्यात देवदूत ठरला. (Farhan Ansari helped corona Patient from mumbra's Prime Hospital Fire.)


       मुंब्य्रातील प्राईम केअर रुग्णालयाला पहाटे ३.४० च्या सुमारास शॉर्कसर्कीटमुळे भीषण आग लागली. त्याच वेळेस अन्सारी हे नमाज अदा करण्यासाठी उठले होते. त्यावेळेस त्यांची नजर खिडकी समोरील हॉस्पीटलकडे केली. त्यांनी लागलीच आपल्या भावांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले. आतून आवाज येत होतो, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, धुरांचे लोळ उडत होते. त्यामुळे काय करावे, रुग्णांना बाहेर कसे काढावे असा प्रश्न त्याला सतावत होता. परंतु क्षणाचाही त्याने विचार न करता, त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूस वॉर्ड मधील भिंतीच्या खिडकीच्या रॉडने ग्रीन तोडून त्यां सुरवातीला तीन रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर आपल्या सहका:यांच्या मदतीने आणखी पाच जणांनी त्यांनी बाहेर काढले. रुग्ण घाबरेले होते, धुरामुळे त्यांना दम लागत होता, श्वास कोंडला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढणो हाच आमचा विचार सुरु होता.

दुसरीकडे आमचे सहकारी कोणी अम्ब्युलेन्सवाल्यांना फोन केला, कोणी महापालिकेशी संपर्क साधत होता. त्यानंतर आम्ही या सर्वाना बाहेर काढून आजू बाजूच्या रुग्णालयात नेले असल्याची माहिती फरहान अन्सारी यांनी दिली. परंतु या रुग्णालयाला अमेरेन्सी जीना असता, तर कदाचित रुग्ण स्वत: बाहेर येऊन आपला जीव वाचवू शकले असते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय रुग्णालयातील ३५ ऑक्सीजनचे सिलेंडर देखील त्यांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: Mumbra Hospital Fire: Lawyer Farhan Ansari helping corona Patient who choked in Prime Hospital Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.