शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मुंबईप्रमाणे ठाण्यात रस्तासुरक्षेचा प्रचार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:09 AM

ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उच्चशिक्षित ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...

पंकज रोडेकर मुंबईत, बोरिवलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर मिळालेल्या पदोन्नतीद्वारे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उच्चशिक्षित ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...

शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून आपण ओळखले जाता?होय मला, चुकीचे काम अजिबात आवडत नाही आणि सहनही होत नाही. मी जेव्हा बोरिवली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रमुख) होतो, त्यावेळी रिक्षा तसेच दलालासंदर्भात आणि नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात पोलीस ठाण्यात एकूण ७५ एफआयआर दाखल केले आहेत. त्यानंतर, याप्रकरणी अटकेची कारवाई झाल्यानंतर दाखल फौजदारी गुन्ह्याबद्दल न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाली आहेत.

आपल्या नावावर चार महिन्यांच्या अंतराने दोन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहेत.बोरिवलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रस्तासुरक्षा सप्ताह राबवताना, पहिल्यांदाच मुंबईत जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. ती गोरेगाव, एसआरपीएफ ते बांद्रे अशी होती. तीत एकूण ११ हजार मोटारसायकली सहभागी झाल्याने त्याची गिनीज बुकने नोंद घेतली होती. त्यानंतर, चार महिन्यांतच देशाचा हॅण्डबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून हॅण्डबॉल लीग यशस्वी केली, त्यावेळीही बेस्ट हॅण्डबॉल म्हणून त्याचीही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

आपण राज्यघटनेचे अभ्यासक आहात.मुळात शिक्षणाची आवड आणि गोडी असल्याने जगातील ७५ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना, त्याच्यावरही एक मसुदा लिहिण्याचे धाडस केले आहे.

रणजीसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्यानंतरही आपण, शिक्षणाला पसंती दिली.मी, बारावीला असताना, राज्यात प्रथम आलो होतो. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना, माझी रणजी क्रिकेटसाठी महाराष्टÑ संघात निवड झाली होती. त्यावेळी शिक्षणाच्या गोडीमुळे मैदान सोडून शिक्षणाला पहिली पसंती दिली. इंजिनीअरिंगला असताना, दोन सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर, एक वर्ष टाटा संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम केल्यानंतर शासकीय सेवेकडे वळलो.

नागरिकांना काय आवाहन कराल ?युवकांनी आदर्श नागरिक व्हावे, चांगले शिक्षण आणि निर्व्यसनी राहून रस्तासुरक्षेच्या नियमावलींचे पालन करावे, तसेच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रहितासाठी कार्य करावे. त्याचबरोबर वाहनांसंदर्भात काही अडचणी येत असतील, तर थेट आपल्याशी संपर्क साधावा.

ठाण्यात नवनवीन उपक्रम राबवून नागरिकांसाठी एक आदर्श कार्यालय बनवून मुंबईप्रमाणे रस्तासुरक्षेचा प्रचार करायचा आहे. - रवी गायकवाड, आरटीओ, ठाणे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी