शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटीतील ‘त्या’ बोटीची खासदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:03 IST

कर्ज माफ करा : बंधाऱ्यावर आदळून फुटली बोट

पालघर : सातपाटीच्या किनाºयावरील दगडी बंधाºयावर आदळून फुटलेल्या ‘प्राजक्ता’ नौकेची खासदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी पाहणी करून मत्स्यव्यवसाय विभागाने पदुम विभागाच्या शासन निर्देशाप्रमाणे त्या कुटुंबीयांवरील राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेंतर्गत (एनसीडीसी) कर्ज आणि व्याज निर्लेखित करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.अरबी समुद्रात वादळी वाºयाने ५ आॅगस्टला सातपाटीच्या किनाºयावरील दगडी बंधाºयावर आदळून मच्छीमार मोरेश्वर चौधरी यांची ‘प्राजक्ता’ ही मासेमारी नौका फुटली होती. शासनाच्या एनसीडीसी योजनेंतर्गत सुमारे २० लाखांचे कर्ज आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहकारी संस्थेद्वारे घेतलेले पाच लाखांच्या कर्जातून ही नौका बांधली होती. खासदार गावित, तहसीलदार सुनील शिंदे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, कृती समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती मेहेर, मंडळ अधिकारी मनोहर वसावे आदींनी सोमवारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी प्राजक्ता बोटमालकावरील सुमारे २० लाखाचे कर्ज आणि मासेमारी व्यवसायासाठी घेतलेले पाच लाखाचे कर्ज माफ करण्याबाबत प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना खा. गावितांनी उपस्थित अधिकाºयांना दिल्या.या निर्णयाचा आधारशासनाने २ मे २०१८ रोजी एनसीडीसी-अंतर्गत मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण करणे व यासाठी मच्छीमारांना अर्थसाहाय्य मंजूर करताना स्थावर व जंगम मालमत्ता तारण ठेवण्यासंबंधी कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या नियमित वसुलीबाबत सुधारित अटी व शर्तीबाबत शासन निर्णय काढला होता. या निर्णयाच्या प्रस्तावनेतील १४ क्रमांकाच्या मुद्द्यात १९७६ पूर्वीच्या या योजनेअंतर्गत बांधलेल्या तसेच त्यानंतरही बांधलेल्या आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णत: निकामी झालेल्या किंवा गटप्रमुख व गट सदस्य हयात नसल्यास नौकेची सध्याचे विक्र ी मूल्य विचारात घेऊन कर्ज, व्याज निर्लेखनास मान्यता देत असल्याचा उल्लेख आहे.