खासदार-आमदारांनी मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाची पाहणी करून घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:35 IST2021-09-30T16:34:45+5:302021-09-30T16:35:04+5:30

बुधवारी झालेल्या पाहाणी दौऱ्याच्यावेळी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, पालिका आयुक्त दिलीप ढोले, एम.एम.आर.डी.ए., मेट्रो , महामार्ग प्राधिकरण, अदानी इलेक्ट्रिक, महापालिका आदींचे अधिकारी तसेच नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

MPs and MLAs inspected the work of Mira Bhayander Metro | खासदार-आमदारांनी मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाची पाहणी करून घेतला आढावा

खासदार-आमदारांनी मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाची पाहणी करून घेतला आढावा

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात चालू असलेल्या मेट्रो कामाचा आढावा घेण्याबाबत दहिसर चेक नाका ते नेताजी सुभासचंद्र बोस मैदान दरम्यानच्या मेट्रोच्या कामाची खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहाणी केली व कामाचा आढावा घेतला. 

बुधवारी झालेल्या पाहाणी दौऱ्याच्यावेळी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, पालिका आयुक्त दिलीप ढोले, एम.एम.आर.डी.ए., मेट्रो , महामार्ग प्राधिकरण, अदानी इलेक्ट्रिक, महापालिका आदींचे अधिकारी तसेच नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

आ. जैन यांनी मेट्रोच्या कामा लागत मुख्य रस्त्याच्या अपूर्ण काम राहिलेल्या ठिकाणी झालेल्या दुरावस्थेबाबत एम.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. खा. विचारे यांनी सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करून रहदारीयुक्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना तसेच मेट्रो कामाचा ठेकेदार जे कुमार यास दिले. 

मेट्रोचे काम जलदगतीने आणि सुलभरीत्या व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रलंबित असलेल्या मेट्रोच्या सर्व परवानग्या तात्काळ द्याव्यात असे खा. विचारे आणि आ. जैन यांनी  सांगितले. 

Web Title: MPs and MLAs inspected the work of Mira Bhayander Metro