खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोईल यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 07:11 PM2019-12-14T19:11:12+5:302019-12-14T19:11:26+5:30

रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नावर खासदार डॉ.शिंदे यांनी आज रेल्वेचे डीआरएम गोईल यांची भेट घेतली.

MP Dr. Shrikant Shinde meets DRM Shalabh Goel of Central Railway | खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोईल यांची भेट

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोईल यांची भेट

Next

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली दिशेकडील कोपर पूल पाडण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पत्र व्यवहार केला आहे. रेल्वे सेफ्टी कमीशनकडून हा पूल पाडण्यासंदर्भात आणि नविन पुल बांधण्यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात मंजूरी मिळणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नावर खासदार डॉ.शिंदे यांनी आज रेल्वेचे डीआरएम गोईल यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध प्रश्नावर चर्चा केल्यावर गोईल यांनी खासदार शिंदे यांना उपरोक्त ग्वाही दिली आहे. महापालिकेने कोपर पूलाचे डिझाईन रेल्वेकडे 18 ऑक्टोबर रोजी सादर केले होते. त्यानंर रेल्वेकडे खासदार शिंदे यांनी विचारणा केल्यावर या डिझाईनला 8 नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडून मंजूरी दिली गेली होती. त्या पश्चात महापालिकेने कोपर पूल पाडण्याविषयी विचारणा रेल्वेकडे केली होती. त्यावर रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. पूल तोडून त्याठिकाणी नव्या पूलाच्या बांधकामासही तातडीने मंजूरी दिली जाणार असल्याचे डिआरएम यांनी खासदार शिंदे यांना आश्वासित केले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूलाचे काम एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्याचे गर्डर तयार करण्याचे काम पुण्याला सुरु आहे.

डोंबिवली फास्ट गाडी ही यार्डातून सुटण्यापूर्वीच काही प्रवाशी जागा धरण्यासाठी त्यात प्रवेश करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची नेमणूक करावी अशीही मागणी खासदार शिंदे यांनी यावेळी केली आहे.

याशिवाय कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सात पासून लोकग्रामकडे जाणार्या पूलाचे डिझाईन तयार करणे. तसेच पूलाच्या कामाचे मार्किग करण्याकरीता रेल्वे व महापालिकेच्या अधिका्रयांची संयुक्तीक पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाईल. त्यासही रेल्वेकडून सहमती दर्शविण्यात आली आहे. यापूलाच्या खर्चासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 19 डिसेंबर रोजीच्या स्मार्टसिटी अंतर्गत मंजूरी दिली जाणार आहे. जवळपास 39 कोटी रुपये खर्चास मंजूरी देण्याचा विषय स्मार्टसिटी बैठकीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

दिवा वसई मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकात सोयी सुविधा अपुर्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. विशेषत: महिला प्रवासांची गैरसोय होते. त्याठिकाणी सोयी सुविधा पुरविल्या जाव्यात. त्याचप्रमाणो सगळ्य़ात मोठी गैरसोय आहे ती म्हणजे दोन गाडय़ांच्यामध्ये चार तासाचे अंतर आहे. ते कमी करण्यासाठी मेमू सव्रिस गाडय़ांची संख्या वाढविण्याचा मुद्दा खासदार शिंदे यांनी संसदेच्या अधिवेशनात नुकताच उपस्थित केला असल्याने गाडय़ांची संख्या वाढवून सोयी सुविधा पुरविण्याचे आश्वासन डीआरएम यांनी शिंदे यांना दिले आहे. यावेळी दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, आणि रेल्वेकडून आशुतोष गुप्ता, सुरेश पाखरे, कडोंमपा कडुन जयवंत विश्वास उपस्थित होते.

Web Title: MP Dr. Shrikant Shinde meets DRM Shalabh Goel of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.