शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

भाजपाला हद्दपार करण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 2:30 AM

राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आता स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

- अजित मांडके ठाणे : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आता स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यानुसार, आता ठाणे महापालिकेतही येत्या काळात हीच समीकरणे रुजू पाहत असून त्याची झलक नुकत्याच झालेल्या महासभेत दिसून आली आहे. विशेष म्हणजे राज्याची समीकरणे जुळवताना ठाणे पॅटर्न राबवला जाणार असून आता तोच येत्या काळात ठाणे जिल्ह्यातही राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या समीकरणात शिवसेना, राष्टÑवादी, काँग्रेस आणि मनसेलाही बढती मिळणार असल्याची चर्चा आहे.राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी समीकरणे जुळत आली आहेत. त्यानुसार, येत्या काळात हीच समीकरणे महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांत जुळण्याची चिन्हे आहेत. ज्याज्या पातळीवर भाजप आहे, त्यात्या ठिकाणावरून त्यांना हद्दपार करण्यासाठी ही महाशिवआघाडी खुली केल्याचीही चर्चा आहे.ठाणे महापालिकेतही आता ही समीकरणे रुजण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेत सध्या एकहाती शिवसेनेची सत्ता आहे. तर, राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. भाजप सत्तेत नसली तरी आतापर्यंत कुरघोडीचे राजकारण त्यांच्याकडून सुरू होते. मध्यंतरी, सत्तेत सहभागी होण्यासाठीही त्यांच्या हालचाली होत्या. मात्र, शिवसेनेने त्यांना लांबच ठेवले आहे. परंतु, असे असले तरी महापालिकेत मैत्रीपूर्ण संबंध या दोनही पक्षांत दिसत होते. मात्र, आता राज्यातील समीकरणे बदलली असल्याने त्याचे पडसाद ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत दिसले. सोमवारी झालेल्या महासभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी आधीच बैठक घेऊन भाजपला एकाकी पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महासभेतही तेच चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपची मंडळी हवालदिल झाल्याचे दिसले. येत्या दोन वर्षांच्या काळात जरी राष्ट्रवादी ही विरोधी बाकावर राहणार असली, तरी खरा विरोधक म्हणून भाजपच काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.।भाजपचे अवसान गळालेएकीकडे राज्यातील निवडणुकीत यश मिळविल्यानंतर भाजपने ठाणे महापालिकेवर लक्ष केंद्रित केले होते. याची रणनीतीही या निवडणुकीआधीच ठरविण्यात आली असून त्यानुसार पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली होती. शिवाय, शिवसेनेला अडचणीत कसे आणायचे, कोणते मुद्दे लावून धरायचे, मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, याची सर्व गणिते निश्चित झाली होती. याकामी महापालिका प्रशासनालाही हाताशी धरण्याचे प्रयत्न सुरू होते. एकूणच पुढील दोन ते अडीच वर्षांत याच रणनीतीवर महापालिकेवर कमळ फुलवायचे निश्चित झाले होते. परंतु, आता महाशिवआघाडीच्या नव्या समीकरणामुळे भाजपचे अवसान आतापासूनच गळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणती रणनीती आखायची, कशी पावले उचलायची, याचा अभ्यास आता या पक्षाकडून सुरू झाला आहे. तर, महाशिवआघाडीकडून भाजपला सर्व स्तरांतून कसे मागे टाकायचे, यासाठीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. याशिवाय, ही महाशिवआघाडी येत्या काळात कायम राहिली, तर २०२२ मध्ये होणाºया ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही तसे पडसाद उमटण्याची शक्यता असून तसे झाले तर शिवसेनेबरोबर सत्तेची चव चाखण्यासाठी मागील अनेक वर्षे वाट पाहणाºया राष्टÑवादीचेही स्वप्न यानिमित्ताने साकार होईल, असे सध्या तरी चित्र आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका