शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

कोरोनाच्या संशयीतांवर पालिका ठेवणार जीपीएसद्वारे नजर, केव्हीगार्ड अ‍ॅप होम कॉरन्टाईनंच्या मोबाइलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 1:54 PM

होम क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्या नागरीकांवर आता ठाणे महापालिका जीपीएसद्वारे नजर ठेवणार आहे. त्यानुसार आता जीओ टॅगींगचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे. परंतु जर एखाद्या नागरीकाने आपला मोबाइलच घरी ठेवला तर त्याचे परिणामही इतरांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार आता केव्हीगार्ड अ‍ॅपच्या सहाय्याने होम कॉरन्टाइनवर केलेल्यांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसार रविवार पासून या सर्वांचे जीओ टॅगींगटचे काम सुरु झाले असून ते सोमवारी पूर्ण झाले आहे. त्यानुसार आता ज्यांना होम कॉरन्टाइन करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर या जीपीएसद्वारे नजर ठेवली जाणार आहे.                               कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्याला आळा बसावा यासाठी गर्दी करु नका असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील बाजारपेठांमध्ये गर्दी केली जात आहे. दुसरीकडे, जे परदेशातून आलेले नागरीक आहेत, किंवा त्यांच्या संपर्कात आलेले नागरीक असतील अशांना होम कॉरन्टाइन केले जात आहे. परंतु असे नागरीक देखील बाहेर पडतांना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे या होम कॉरन्टाइन संशयीतांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून जीपीएसद्वारे नजर ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील त्यादृष्टीने खबरदारी घेण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने पालिकेने देखील आतापर्यंत होम कॉरन्टाइन करण्यात आलेल्या १८६१ नागरीकांना तसेच नव्याने येणाऱ्या नागरीकांवर देखील अशा पध्दतीने देखरेख ठेवली जाणार आहे. या नागरीकांच्या मोबाइलमध्ये केव्हीगार्ड हे अ‍ॅप महापालिकेच्या माध्यातून डाऊनलोड केले जाणार आहे. त्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून आणि जीपीएसद्वारे या नागरीकांना नजर ठेवली जाणार आहे. संबधींत नागरीक ठराविक ठिकाणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर महापालिकेच्या संबधींत केंद्रात याची तत्काळ माहिती उपलब्ध होणार आहे. त्यानुसार संबधींत नागरीका पुन्हा होम कॉरन्टाइन केले जाणार आहे. त्यानुसार सध्या मागील दोन दिवसापासून जीओ टॅगींगचे काम सुरु झाले असून ते आता संपणार आहे. त्यानंतर आता हे काम सुरु होणार आहे. 

  • केव्हीगार्ड अ‍ॅपद्वारे नजर ठेवतांनाच आता या नागरीकांशी रोज संबधींत विभागाचे डॉक्टर, पालिकेचे इतर पदाधिकारी व्हीडीओ कॉल करुन या नागरीकांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यांना काय हवे काय नको, त्यांची प्रकृती कशी आहे, याचीही विचारपुस केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

जीपीएसचा असाही धोकामहापालिकेच्या माध्यमातून मोबाइलमध्ये अ‍ॅप टाकून जीपीएसद्वारे नजर ठेवण्याचा जरी हा चांगला विचार पालिकेने आणला असला तरी यामध्ये आणखी एक धोकाही संभवतो आहे, तो म्हणजे जर तुमच्या जवळ मोबाइल असेल तरच तुमचे लोकशेन समजणार आहे. मात्र मोबाइल घरी ठेवून एखादा नागरीक बाहेर जाण्याची शक्यता यात नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीकांना या प्रक्रियेला सहकार्य करावे अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका