शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल टॉवरमुळे जातात शाळेच्या इमारतीला तडे

By admin | Updated: February 5, 2016 02:40 IST

पालिकेच्या भादवड येथील शाळेच्या इमारतीवरील मोबाइल टॉवर आणि अन्य यंत्रांच्या वजनाने इमारतीच्या तळ मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या स्लॅबला तडे गेले आहेत

पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीपालिकेच्या भादवड येथील शाळेच्या इमारतीवरील मोबाइल टॉवर आणि अन्य यंत्रांच्या वजनाने इमारतीच्या तळ मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या स्लॅबला तडे गेले आहेत. गॅलरी आणि खिडक्यांचे गज वाकवून संपूर्ण इमारतच धोकादायक बनली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासनाने वारंवार पालिकेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने विद्यार्थी अक्षरश: जीव मुठीत घेऊन शिकत आहेत.भादवडच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन १९९० च्या सप्टेंबरमध्ये झाले. या तीन मजली इमारतीत तीन प्राथमिक आणि एक माध्यमिकअशा चार शाळा भरतात. प्राथमिकच्या सत्रात ८६८ आणि माध्यमिकच्या सत्रात २१३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह शिक्षक आणि इतर कर्मचारीही आहेत. मात्र, इमारतीची क्षमता लक्षात न घेता आठ वर्षांपूर्वी बसवलेल्या बीएसएनएलच्या अवजड मोबाइल टॉवरमुळे इमारतीच्या तळातील खांब खचू लागले असून जिन्याला आणि स्लॅबला तडे गेले आहेत. पावसाळ्यात स्लॅब गळतात. इमारतीची क्षमता लक्षात न घेता टॉवर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षकांसह पालकांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पालिकेकडून इमारतीची देखभाल-दुरुस्ती न झाल्याने इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील नागरिकांना नेहमी स्ट्रक्चरल आॅडिटसाठी नोटिसा बजावणारा पालिकेचा बांधकाम विभाग स्वत:च्या इमारतीबाबत मात्र जागरूक नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता किंवा अनधिकृत टॉवर न हलविता थातूरमातूर दुरुस्ती सध्या सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.