शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

भाजपच्या जाहिरातबाजीला 'मनसे' प्रत्युत्तर, डोंबिवली विमानतळाचे केले प्रतीकात्मक भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 4:30 PM

भाजपाच्या जाहिरातबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज प्रतीकात्मक आंदोलन केले.

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा समस्या आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याने लोकांचा जीव जात आहे. तसेच मध्य रेल्वेचा प्रवास जीवघेणा आहे. या सगळ्य़ा समस्यांनी कल्याण डोंबिवलीकर त्रस्त असताना भाजप सरकारने कोटय़ावधी रुपये विकास प्रकल्पांसाठी खर्च केल्याची जाहिरातबाजी निवडणूकीच्या तोंडावर सुरू केली आहे. या जाहिरातबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज प्रतीकात्मक आंदोलन केले. डोंबिवली पश्चिमेला मोठा गाव ठाकूर्ली येथे 30 एकर जागेवर 3 हजार कोटी रुपये खर्चाचे विमानतळ उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन करून भाजपच्या जाहिराबातीला सडेतोड उत्तर दिले आहे. मनसेचे हे आंदोलन लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरले आहे.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात मनसेचे विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, नगरसेविका सरोज भोईर, पदाधिकारी हर्षद पाटील, राहूल कामत, सागर जेधे, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, वेद पांडे, महिला आघाडीच्या मंदा पाटील, प्रतिभा पाटील,दीपीका पेंडणोकर, स्मिता भणगे, सुमेधा थत्ते आदी उपस्थित होते. मनसेने भूमीपूजनासाठी मोठा मंडप उभारला होता. तसेच पूजन करण्यासाठी भटजींना पाचारण केले होते. विमानतळाच्या प्रकल्पाची मोठी जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे अनेक डोंबिवलीकरांनी खरोखरच विमानतळ उभारले जात आहे का अशी विचारणा मनसेच्या कार्यकर्कत्यांकडे केली होती. यावेळी मनसेचे काही कार्यकर्ते अरब वेशभूषा धारण करुन आले होते. त्यांनी तीन हजार कोटीचा धनादेश अरब राष्ट्राकडून विमानतळासाठी निधीच्या स्वरुपात देत असल्याचे नाट्य त्याठिकाणी उभे केले. त्याचबरोबर पत्रीपूल आणि कोपर पूल उभारला तर आणखीन दोन हजार कोटी अरब राष्ट्राकडून दिले जातील असेही यावेळी सांगण्यात आल्यावर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांच्या चक्क भुवया उंचावल्या.भूमीपूजनापश्चात हवेत सोडण्यात येणा-या फुग्यांच्या गुच्छांला खेळण्यातील प्लास्टिक विमाने बांधून ती हवेत सोडण्यात आली. प्रत्येक विमानाला भाजपच्या आश्वासनाचे नाव दिले गेले होते. साडेसहा हजार कोटीचे आश्वासन हवेत उडाले. पत्री पूल, कोपर पूल, मोठा गाव ठाकूली, 27 गावांची नगरपालिका या आश्वासनांची उड्डाणो हवेत सोडली गेली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसेBJPभाजपा