MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "या हातानं पाप केलं नाही, तर त्या नोटीसी कोणत्याही असो मी भीक घालत नाही;" राज ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:02 IST2022-04-12T20:01:23+5:302022-04-12T20:02:17+5:30
MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला असं म्हणतात. मला ट्रॅक बदलायला लागत नाही : राज ठाकरे

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "या हातानं पाप केलं नाही, तर त्या नोटीसी कोणत्याही असो मी भीक घालत नाही;" राज ठाकरे कडाडले
"अनेक पक्षाच्या नेत्यांचे जे अकलेचे तारे तोडले, त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. पत्रकार परिषदेत मला हे उत्तर द्यायचं नव्हतं. मला विषय भरकटवून द्यायचा नव्हता. म्हणून मी अविनाश जाधव यांना ठाण्यात सभेबद्दल विचारलं. काही ठिकाणी वीज नाहीये म्हणून ही सभा दाखवत नाहीयेत असं एकानं सांगितलं. पण आजकाल हे मोबाईलवरही दिसतं. तुमच्या करंटची अपेक्षाच नाही. जम्मूमध्येही ही सभा दाखवली जातेय. अनेक राज्यात ही सभा दाखवली जातेय," असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित उत्तर सभेत अनेक विषयांवर भाष्य केलं.
MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "गेल्या निवडणुकीच्या वेळी बहुमत शिवसेना भाजपकडे आल्यावर मतदारांची प्रतारणा केली. पहाटेचा एक शपथविधी झाला, मग तो फिस्कटला. या दोन्हीवर बोलल्यावर ही भाजपची स्क्रिप्ट कुठून आली. हे जे विसरले होते ती मी आठवण करून दिली. जेव्हा मी मोदींवर बोललो तेव्हा मला त्या भूमिका मला नाही पटल्या. उघडपणे बोललो. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला असं म्हणतात. मला ट्रॅक बदलायला लागत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
"माहिती करून घ्यायची नाही, आयएल अँड एफएस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचं नाही म्हणून एका वर्षात त्यातून बाहेर पडलो. त्या कंपनीच्यासाठीची नोटीस होती. ती नोटीस आल्यावर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली तर यावर एवढं नाटक केलं. हातानं जर पाप केलं नाही तर नोटीसी राजकीय असू दे की कायदेशीर मी भीक नाही घालत त्याला," असंही ते म्हणाले. उद्या मला एखादी गोष्ट नाही पटली, तर परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिलेत, टीका करा असं नाही करणार. आता तुम्ही शेण खाल्लंय, आता तुमच्यावर टीका करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.