पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

By मोरेश्वर येरम | Published: November 21, 2020 05:37 PM2020-11-21T17:37:45+5:302020-11-21T17:43:30+5:30

राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

mns mla raju patil slams aditya thackeray over kalyan patri bridge issue | पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

Next
ठळक मुद्देपत्री पुलाच्या रखडलेल्या कामावरुन मनसेचे शिवसेनेला टोलाकल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांची आदित्य ठाकरेंवर टीकापत्री पुलाजवळील ९० फीट रस्त्याच्या अर्धवट कामावर मनसेने दाखवलं बोट

कल्याण
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्री पुलाच्या कामाला आता वेग आला आहे. पण या पुलाच्या बांधकामाबाबत झालेल्या विलंबावरुन आरोपप्रत्यारोप काही थांबताना दिसत नाहीयत. पत्री पुलाच्या गर्डर बसविण्याचं काम आजपासून हाती घेण्यात आलं आहे. हे काम पाहण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. 

'पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली हे आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावे', असा खरमरीत टोला मनसेनेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

कल्याण मधील पत्री पुलाचे गर्डर बसविण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक देखील घेण्यात आला आहे. दोन दिवस गर्डर बसविण्याचे काम चालणार आहे. या कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. 

पत्री पुलाचं काम बराच काळ रखडल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये रोष निर्माण झाला होता. विरोधकांकडूनही शिवसेना आणि रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका सुरू होती. आज पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना मनेसेचे आमदार राजू पाटील हे पुलाजवळ असलेल्या ९० फीट रस्त्यावरील अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. याच वेळी आयुक्त पत्री पुलाजवळ असल्याचे त्यांना कळाले. राजू पाटील मनसे कार्यकर्त्यांसोबत पत्री पूल परिसरात येताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर आयुक्त तिथून निघून गेल्याचं कळातचं राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. पुढे आयुक्तांशी फोनवर बोलणी झाल्यानंतर सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं.
 

Web Title: mns mla raju patil slams aditya thackeray over kalyan patri bridge issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.