जागेच्या वादातून मनसेने फोडले बिल्डरचे कार्यालय

By Admin | Updated: March 2, 2016 01:51 IST2016-03-02T01:51:37+5:302016-03-02T01:51:37+5:30

येथील एका इमारतीलगतच्या जागेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला फलक व झेंडा काढून कचऱ्यात टाकल्याने मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी विकसकाच्या कार्यालयाची तोडफोड केली.

MNS created office of builder's office | जागेच्या वादातून मनसेने फोडले बिल्डरचे कार्यालय

जागेच्या वादातून मनसेने फोडले बिल्डरचे कार्यालय

मीरा रोड : येथील एका इमारतीलगतच्या जागेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला फलक व झेंडा काढून कचऱ्यात टाकल्याने मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी विकसकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोडचा मोकळा सुटलेला कोपरा वाचनालय आणि कार्यालयाच्या नावाखाली बळकावण्याचा प्रयत्न मनसे नेत्यांनी केला. तो अंगलट आल्याने हा हल्ला केल्याचा आरोप बिल्डरने केला आहे.
शांतीनगरच्या सेक्टर ११ मध्ये टीएमटीच्या बस स्थानकाजवळ राज रिअ‍ॅलिटीचे कार्यालय आहे. तेथे सकाळी मनसेचे झेंडे गळ््यात घातलेले साधारण २० जण आले. त्यांनी निषेधाच्या घोषणा देत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत काचा फोडल्या आणि सामानाची तोडफोड केली. नंतर घोषणा देत ते निघून गेले. या प्रकरणी पोलिसांनी दंगलीसह गुन्हे दाखल केले आहेत. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व तोडफोड दिसते. १० जणांची ओळख पटली असून उरलेल्यांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी साळुंके यांनी सांगितले.
बिल्डर राजेश सिंह यांनी मात्र पोलिस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे . हेतल पार्कभागात रायगड मित्र मंडळाच्या नावाखाली सचिन मिश्रा व साथीदारांची गुंडगिरी आहे. माझी जागा बळकावून तेथे कार्यालय उघडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: MNS created office of builder's office