ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

By अजित मांडके | Published: October 6, 2023 04:54 PM2023-10-06T16:54:41+5:302023-10-06T16:55:58+5:30

टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते.

MNS agitation continued for the second day in a row in Thane | ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

googlenewsNext

ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते. परंतु मनसेच्या शिष्ठमंडळाने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना दालनात बोलावून घेऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले. परंतु जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याची माहिती मनसेने दिली.

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोबर पासून लागू केलेल्या दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३० सप्टेंबरपासून जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर पासून मनसेच्या वतीने या भागात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात मनसेचे ठाणे पालष्घर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवि मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे, स्वप्नील महिंद्रकर यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. टोलदरवाढ रद्द करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यानुसार गुरूवारी सांयकाळी एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी देखील त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीत आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरुच असल्याचे दिसून आले. दरम्यान आंदोलनादरम्यान पदाधिकाºयांची डॉक्टरांनी तपासणी देखील केली.

दुसरीकडे मनसेच्या शिष्ठ मंडळाने या संदर्भात जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही भेट झाली नाही. त्यामुळे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांचे म्हणने देखील ऐकूण घेतले. शिवाय या संदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल असे आश्वासनही दिले आहे. परंतु असे असेल तरी देखील जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, ठाणेकरांची टोलदरवाढीतून सुटका होत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

Web Title: MNS agitation continued for the second day in a row in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.