लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : भाजपने काहींना उमेदवारीसाठी पक्षाचा एबी फॉर्म दिला, त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र तासाभरातच पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म देत आधी फॉर्म दिलेल्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरू नये अशा आशयाचे पत्र त्यासोबत देत वेगळीच खेळी खेळल्याचे दिसून आले. यामुळे इच्छुकांचे इतरत्र जाण्याचे मार्ग तर बंद झालेच मात्र पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही ते अपक्ष ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रभाग १८ मधील भाजप माजी नगरसेवक विजय राय यांना शेवटच्या दिवशी दुपारी एबी फॉर्म दिला. मात्र त्यानंतर विवेक उपाध्याय यांनाही एबी फॉर्म दिला. सोबत भाजपकडून पत्र देऊन राय यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरू नये व उपाध्याय यांचा फॉर्म अधिकृत समजावा अशा आशयाचे पत्र देऊन राय यांचा पत्ता कापला गेला. शेवटच्या क्षणी हा प्रकार घडल्याने राय यांना अन्य पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे मार्ग बंद झाले.
छाननीच्या दिवशी पत्राबद्दलच घेतला संशय
भाईंदर पूर्व भागातील भाजपचे प्रभाग ४ मधील माजी नगरसेवक गणेश भोईर यांना शेवटच्या दिवशी दुपारी एबी फॉर्म दिला. भोईर यांनी तो दाखल केला. मात्र तासाभरातच भाजपने मधुसूदन पुरोहित यांना एबी फॉर्म दिला व सोबत भाजप जिल्हाध्यक्ष यांचे पत्र दिले ज्यात भोईर यांचा एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा व पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून पुरोहित यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरावा, असा उल्लेख होता.
बुधवारी छाननीच्या दिवशी गणेश भोईर यांनी पुरोहित यांच्या एबी फॉर्मसोबत जोडलेल्या जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांच्या पत्राबद्दलच संशय घेतला. हे पत्र व सही बनावट असू शकते ह्या मुद्द्यावर पुरोहित यांना जिल्हाध्यक्ष जैन यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर आणून पुरोहित हे अधिकृत उमेदवार असल्याची हमी द्यावी लागली.
Web Summary : BJP created chaos by issuing AB forms to multiple candidates, then retracting support via letters from the district president. This left original candidates stranded and questioning the authenticity of the withdrawal letters during scrutiny.
Web Summary : भाजपा ने कई उम्मीदवारों को एबी फॉर्म जारी कर भ्रम पैदा किया, फिर जिलाध्यक्ष के पत्रों के माध्यम से समर्थन वापस ले लिया। इससे मूल उम्मीदवार फंस गए और जांच के दौरान वापसी पत्रों की प्रामाणिकता पर सवाल उठाने लगे।