शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

मीरा - भार्इंदरमध्ये सामान्यांचा पाण्याकरिता टाहो तर नेते सुशेगाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:13 IST

टंचाईच्या काळात नवीन जलजोडण्या देणे थांबते, मात्र नवीन इमारतींना परवानगी देणे थांबत नाही. लोकानुनय सुरूच आहे.

- धीरज परब, मीरा-भार्इंदरमीरा-भार्इंदर ही शहरे झपाट्याने विकसित होणारी शहरे आहेत. सध्या या शहरांना तीव्र पाणीकपात भेडसावू लागली आहे. टंचाईच्या काळात नवीन जलजोडण्या देणे थांबते, मात्र नवीन इमारतींना परवानगी देणे थांबत नाही. लोकानुनय सुरूच आहे. टंचाईचे संकट हलके करण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग व तत्सम उपाययोजनांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.पाणीकपात सुरू झाल्याने मीरा-भार्इंदरमध्ये टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून येत्या काळात दिवसागणिक त्या वाढत जाणार आहेत. नागरिकांना पाण्याचे नियोजन करण्याची कसरत करावी लागणार आहे. पाणीयोजनांची आश्वासने व करोडो रुपयांची मंजुरी मिळाल्याचे भासवून लोकांना २४ तास पाणी देण्याच्या राजकीय भूलथापा राजकारणी निवडणुकीत मारतात. पाणी आणल्याच्या जाहिराती करत स्वत:ची पाठ थोपटून घेतात. वारेमाप उंच इमारतींना मंजुऱ्या देताना पाणीसाठ्याचा विचार केला जात नाही. नोटांची झापडं डोळ्यांना लावल्याचा कदाचित तो परिणाम असावा. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करण्याऐवजी निव्वळ राजकीय व आर्थिक फायद्याचा विचार ते करतात. पाण्याचा पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणी जिरवणे, यासारख्या पाणीटंचाईवर मात करू शकणाºया महत्त्वाच्या पर्यायांकडे राजकारणी, पालिका प्रशासन सोयीस्कर डोळेझाक करते.मीरा-भार्इंदर हे सर्वात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. पण, त्याचबरोबर पाण्याची प्रचंड टंचाई, परिणामी टंचाईमुळे पेटलेलं शहर ही सुद्धा या शहराची ओळख आहे. पाणी नाही म्हणून नवीन नळजोडण्या देणे बंद करणारे राजकारणी व प्रशासन पाणी नसताना नवीन बांधकामांना परवानग्या देणे मात्र बंद करत नाही. कारण, बहुतांश राजकारणीच बिल्डर आहेत. शिवाय, निधी पुरवणारा सर्वात मोठा वर्ग बिल्डर लॉबी आहे. लोकांना पाणी नाही मिळाले तरी चालेल, पण बिल्डरांच्या इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत, सदनिका विकल्या गेल्या पाहिजेत, असा स्वार्थीपणा सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून फ्लॅट विकत घेणाºयांना नंतर घोटभर पाण्याकरिता वणवण करत बसावे लागते.अधिकृतपणे नळजोडण्या बंद असताना राजकीय नेत्यांना मात्र नियम डावलून त्या दिल्या जातात. लोकांना नळजोडण्या मिळत नसताना नेत्यांच्या शाळा, हॉटेल व आस्थापनांना सहजपणे नळजोडण्या कशा मिळतात? किती लोकप्रतिनिधींच्या घरी अथवा आस्थापनांमध्ये पाणी नाही, म्हणून ओरड कानांवर येते? एका नेत्याच्या भावाने तर दुसºया मजल्यावरील सदनिकेत थेट पालिकेकडून स्वतंत्र नळजोडणी घेतली होती. नळजोडण्या मंजूर करण्यासाठी हात ओले केले जातात. फायलींवर चक्क नगरसेवकांची व्हिजिटिंगकार्ड लावली जातात. पाण्याचा धंदाच त्यांनी मांडला आहे.स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर, तर एमआयडीसीकडून ९० दशलक्ष लीटर पाणी शहराला मिळते. पूर्वीच्या काँग्रेस आघाडी शासनाने मंजूर केलेल्या एमआयडीसीच्या कोट्यातील ७५ दशलक्ष पाण्याचा पुरवठा युती शासनकाळात सुरू झाला. त्या ७५ दशलक्ष लीटरपैकी आजघडीला सुमारे ४० दशलक्ष लीटर पाण्याचाच पुरवठा होत आहे. कारण, धरणातच पाणी नाही, तर मंजूर असले तरी देणार कुठून?सूर्या धरणाचे पाणी मिळेल तेव्हा मिळेल, पण बिल्डर लॉबीला तसेच पालिका निवडणुका तोंडावर असल्याने नव्याने आलेल्या मतदारांना खूश करण्यासाठी कोणताही सारासार विचार न करता सध्या नव्या नळजोडण्यांची खिरापत वाटली जात आहे. सुमारे सहा हजार नवीन नळजोडण्या दिल्या गेल्या आहेत. शहरात पाणीकपात लागू झाली आहे. दरशुक्रवारी २४ तासांसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. एक दिवस पुरवठा बंद राहणार असला तरी त्याची झळ पुढील दोन ते तीन दिवस लोकांना सोसावी लागणार आहे. आधीच ३५ तासांच्या बंदनंतर नागरिकांना पाणी मिळत आहे. आता या कपातीमुळे पाणीपुरवठा ४८ तासांनंतर केला जाणार आहे. वजनदार लोकप्रतिनिधींच्या प्रभागात टंचाईची झळ कमी बसते, असा अनुभव आहे. म्हणजे, शहरातल्या लोकांनाही सापत्न वागणूक मिळते.रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर यामध्येही तोच पक्षपात सुरू आहे. कायद्याने बंधनकारक असले व पाणीटंचाईवर प्रभावी उपाय असला, तरी पालिका व लोकप्रतिनिधींना त्याची अंमलबजावणी करण्यात स्वारस्य नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू आहे, याची कागदावर का असेना, पण फक्त एनओसी हवी आहे.रेन वॉटरच्या योजना प्रभावी असतानादेखील फुटकळ कारणे पुढे केली जातात. रहिवासीसुद्धा सदर योजनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत. स्वत: पालिका व लोकप्रतिनिधीच पालिकांच्या इमारती, वास्तू व ताब्यातील मालमत्तांमध्ये सदर योजना राबवण्यास उत्सुक नसतात. मग, नागरिकांना तरी दोष का द्यावा?रेन वॉटरप्रमाणेच सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. पण, कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेले मलनि:सारण केंद्र गंजले असून बंदच आहे. कुठेतरी अपवादात्मक खानापूर्ती म्हणून प्रकल्प सुरू आहे. बाकी तर आलेले सांडपाणीच थेट खाडी, समुद्रात सोडले जात आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर केला, तरी पाण्याचा पर्यायी स्रोत सहज उभा केला जाऊ शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग व तत्सम योजना जर प्रभावीपणे राबवल्या, तर पाणीटंचाई दूरच होऊन पाण्यासाठी स्वावलंबी शहर म्हणून नवीन ओळख करून देता आली असती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाईMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर