दुचाकी चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:58 IST2020-03-05T21:57:52+5:302020-03-05T21:58:29+5:30
रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हददीतून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

दुचाकी चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
डोंबिवली : दुचाकी चोरणाऱ्या एका १७ वर्षीय चोरटयाला कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हददीतून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत सखोल तपास करुन लवकरात लवकर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. दुचाकी चोरीचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा करत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत अल्पवयीन चोरटयाचा शोध घेत पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढिल कारवाईसाठी अल्पवयीन दुचाकी चोराला विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, विश्वास चव्हाण, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, राहूल ईशी आणि महिला पोलीस नाईक इरपाचे यांनी केली.