शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापुरात पुन्हा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:09 IST2026-02-27T11:04:18+5:302026-02-27T11:09:30+5:30

बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला.

Minor girl student molested in school bus Shocking incident again in Badlapur | शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापुरात पुन्हा धक्कादायक प्रकार

शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापुरात पुन्हा धक्कादायक प्रकार

बदलापूर - बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलंय. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. महत्वाची बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतीस नव्हती. 

बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल केला.

काही दिवासांपूर्वी बदलापुरातल्या स्कूल व्हॅनमध्ये असाच प्रकार घडला होता. स्कूल व्हॅन चालकाने चार वर्षांच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार बदलापुरात घडला आहे. महत्वाचे म्हणजे कालच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करत शाळांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला होता.

Web Title : स्कूल बस में नाबालिग से छेड़छाड़: बदलापुर में चौंकाने वाली घटना

Web Summary : बदलापुर में, एक स्कूल बस ड्राइवर ने एक नाबालिग छात्रा के साथ छेड़छाड़ की। कोई महिला सहायक मौजूद नहीं थी। माता-पिता ने घटना की सूचना दी, जिसके बाद ड्राइवर को पोक्सो और अत्याचार अधिनियम के तहत गिरफ्तार किया गया। यह स्कूल वैन से जुड़ी एक समान घटना के बाद सुरक्षा चिंताओं को बढ़ाता है।

Web Title : Minor Molested in School Bus: Shocking Incident in Badlapur

Web Summary : In Badlapur, a school bus driver molested a minor student. No female helper was present. Parents reported the incident, leading to the driver's arrest under POCSO and Atrocity Act. This follows a similar incident involving a school van, raising safety concerns.