शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या टँकरची कांद्याच्या टेम्पोला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

ठाणे : मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे निघालेल्या कांद्याच्या टेम्पोला दुधाच्या टँकरने धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी माजिवडा उड्डाणपुलावर ...

ठाणे : मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे निघालेल्या कांद्याच्या टेम्पोला दुधाच्या टँकरने धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी माजिवडा उड्डाणपुलावर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

एकनाथ वाघ (चालक) आणि सुनील जाखार अशी जखमी चालकांची नावे आहेत. दुधाचा टँकर मुंबईकडून नाशिकमार्गे तर कांद्याचा टेम्पो नाशिककडून मुंबईकडे निघाला होता. पाऊस नसल्याने दोन्ही वाहने सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जात होती. त्याचवेळी दुधाचा टँकर दुभाजकावरून कांद्याच्या टेम्पोवर जाऊन धडकला. माजिवडा उड्डाणपुलावर लोढा कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. याचदरम्यान दोन्ही वाहनांमधील ऑईल रस्त्यावर पसरले. ऑईल आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनांमुळे सकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास वाहतूककोंडी होण्यास सुरुवात झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, राबोडी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना तातडीने उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी अपघातग्रस्त वाहनेही क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून रस्त्यावर पसरलेल्या ऑईलचीही पाण्याच्या माऱ्याने सफाई केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. नंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.