यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान

By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2025 13:03 IST2025-04-17T13:01:54+5:302025-04-17T13:03:22+5:30

ठाण्याच्या नौपाडा भागातून ३० मार्च रोजी झालेल्या रिक्षाचोरीचा शोध घेताना ठाणे ते मुंब्रा भागातील ८० सीसीटीव्हींची पडताळणी केल्यानंतर सय्यदची ओळख पटली.

'Mastery' of rickshaw theft by watching videos on YouTube! Even M.Com, B.Tech educated thieves face challenges | यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान

यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान

- जितेंद्र कालेकर, ठाणे
यू ट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षा चोरीचे ट्रेनिंग घेत चोरीमध्ये 'मास्टरी' मिळविणाऱ्या शबाब हुसेन रिझवी सय्यद (४१) या एमकॉम झालेल्या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. सुमारे ८० सीसीटीव्हींच्या पडताळणीतून त्याचा शोध घेण्यात आला. मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या पदवीधर चोरट्यालाही अशीच अटक झाली. 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून वृद्धाच्या बँक खात्यातून ८ लाखांचा डल्ला मारणाऱ्या बीटेक आरोपीलाही वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.

ठाण्याच्या नौपाडा भागातून ३० मार्च रोजी झालेल्या रिक्षाचोरीचा शोध घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन आणि निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने ठाणे ते मुंब्रा भागातील ८० सीसीटीव्हींची पडताळणी केल्यानंतर सय्यदची ओळख पटली. त्याला २०२४ मध्येही रिक्षाचोरीच्या प्रकरणात अटक केली होती. एमकॉम झालेल्या शेखने दुबईत विमानतळावर वाहनचालक म्हणून नोकरी केली होती. तो पुन्हा नौपाड्यात रिक्षाचोरीसाठी येणार असल्याची टीप मिळाली आणि त्याला ६ एप्रिल रोजी सापळा रचून अटक केली.

जबरी चोरीमध्ये अडकला पदवीधर

मोटारसायकलवर येऊन जबरी चोरी करणाऱ्या फैज शेख यालाही २२ एप्रिल रोजी नौपाडा पोलिसांनी अटक केली. पदवीधर फैज हा अझरुद्दीन मोमीन याच्या मदतीने मोबाइलची जबरी चोरी करायचा. नौपाडा ते भिवंडी मार्गावरील सुमारे ९० सीसीटीव्हींच्या पडताळणीतून त्याला पकडले. त्याने १०० पेक्षा अधिक मोबाइलची चोरी केल्याचे उघड झाले.

डिजिटल अरेस्ट करणारा निघाला बी. टेक

वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत आठ लाखांचा गंडा घातला होता. टोळीच्या म्होरक्याने सांगितल्याप्रमाणे काम करणारा रोचक श्रीवास्तव या बी.टेक आरोपीला वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल जगताप यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातून डिसेंबर २०२४ मध्ये अटक केली.

दुबईत असताना सय्यदला त्याची पत्नी सोडून गेली. याच वैफल्यातून त्याला दारूचे व्यसन लागले. कुटुंबीयांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली. व्यसन भागविण्यासाठी त्याने रिक्षाचोरी सुरू केली. रिक्षा चोरी केल्यानंतर भाडे घ्यायचे. पेट्रोल संपल्यानंतर रिक्षा सोडायची आणि त्याच पैशातून तो खर्च भागवायचा. त्याच्याकडून सात चोरीचे गुन्हे उघड झाले असून, चार रिक्षा आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या.

Web Title: 'Mastery' of rickshaw theft by watching videos on YouTube! Even M.Com, B.Tech educated thieves face challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.