Thane Fire: ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:50 IST2025-07-14T10:50:08+5:302025-07-14T10:50:32+5:30
Thane Fire : ठाणे स्थानकाजवळ स्कायवॉकला लागून असलेल्या रेल्वे रुळांजवळ आज सकाळी अचानक भीषण आग लागली.

Thane Fire: ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
ठाणेरेल्वे स्थानकाजवळ, स्कायवॉकला लागून असलेल्या रेल्वे रुळांजवळ आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे स्थानकावर आणि परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे, अशी माहिती आरडीएमसीने (प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष) दिली आहे.
सध्या आगीचं पुन्हा भडकणं टाळण्यासाठी 'कूलिंग ऑपरेशन्स' अर्थात भडकलेली आग थंड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि यासंबंधी अधिक माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे.