भाईंदरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, १८ गॅस सिलेंडरच्या स्फोटांनी हादरला परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 00:15 IST2026-04-11T00:10:12+5:302026-04-11T00:15:28+5:30

भाईंदरमध्ये अनधिकृत झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी सिलेंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट मोठे झाले.

Massive fire breaks out in slum in Bhayander, 18 gas cylinder explosions shake the area | भाईंदरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, १८ गॅस सिलेंडरच्या स्फोटांनी हादरला परिसर

भाईंदरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, १८ गॅस सिलेंडरच्या स्फोटांनी हादरला परिसर

भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक पोलीस चौकी समोरील अनधिकृत झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी सिलेंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट मोठे झाले. त्यामुळे आग प्रचंड भडकली होती. 

रात्री आठ वाजता अचानक झोपडपट्टीमध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले. त्यानंतर आगीचे भयावह लोळ आणि धुरांचे लोट सगळीकडे पसरले. या भीषण आगीमुळे परिसरामध्ये एकच घबराट माजली. 

महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सुमारे 25 गॅस सिलेंडर काढण्यात आले त्यातील सुमारे 18 सिलेंडर आगीत स्फोट फुटलेले आढळून आले. 

अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. तिन्ही मृतदेह पूर्णपणे जळून गेले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम रात्री सुरू होते.

Web Title : भाईंदर में भीषण आग, सिलेंडरों के धमाकों से दहशत

Web Summary : भाईंदर पूर्व में इंद्रलोक पुलिस चौकी के पास शुक्रवार रात एक झुग्गी बस्ती में भीषण आग लग गई। सिलेंडर विस्फोटों से आग और भड़क गई। दमकल कर्मियों ने तीन जले हुए शव बरामद किए, जिनकी पहचान की जा रही है।

Web Title : Massive Fire Engulfs Bhayandar Slum, Blasts Trigger Panic

Web Summary : A major fire broke out in a Bhayandar East slum near Indra Lok police station Friday night, triggered by multiple gas cylinder explosions. Firefighters recovered three severely burned bodies. Identification is underway.