Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:11 IST2019-01-04T12:03:21+5:302019-01-04T13:11:22+5:30
बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे.

Video - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
ठाणे - बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (4 जानेवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
माणकीवली एमआयडीसीत प्लॅटीनम पॉलिमर कंपनी आहे. शुक्रवारी सकाळी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
बदलापूर केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू #fire
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 4, 2019