भिवंडीत गोदामाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 23:55 IST2025-10-05T23:55:41+5:302025-10-05T23:55:54+5:30
Bhiwandi Fire News: वंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शाडो फॅक्स, बर्ड व्हिव, कुरिअर गोडाऊनला ही आग लागली आहे.

भिवंडीत गोदामाला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शाडो फॅक्स, बर्ड व्हिव, कुरिअर गोडाऊनला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी भिवंडी महानगरपालिकेची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून, आग शमवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.