भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 19:49 IST2022-03-21T19:48:29+5:302022-03-21T19:49:19+5:30
या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग
भिवंडी- शहरातील खोका कंपाउंड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना व तयार कपडा जळून खाक झाला आहे.
या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले. या आगीची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.