डोंबिवली - येथील रील स्टार मराठी तरुणी एकता सावंत हिचा डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील खाद्यपदार्थाचा स्टॉल महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने हटविला आहे. तिच्याकडून ३०० रुपये हप्ता घेण्यात आला होता, असा आरोप आहे. या प्रकाराची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शुक्रवारी डोंबिवलीत पाठविले. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तिची भेट घेतली. आता येथे मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापले आहे.
परप्रांतीयांच्या स्टॉलवर न काढता एकता सावंत हिचा शोरमा विक्रीचा स्टॉल हटविल्याचा दावा आहे. या प्रकारानंतर राज ठाकरे हे आयुक्तांशी बोलणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ही तरुणी कल्याण पूर्वेत राहते. तिला वडील नाहीत. ती उच्चशिक्षित आहे. महापालिकेचे फेरीवाला हटाव पथक स्टॉल लावण्यास मज्जाव करतात. ३०० रुपयांची मागणी करतात, असा आरोप एकता हिने केला आहे.
एकताने व्यथा मांडली एकताने तिची व्यथा मांडणारा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हजारो लोकांनी पाहिला. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जाधव यांनी डोंबिवलीत धाव घेतली. या न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशन परिसरात १५० मीटरच्या आत फेरीवाला बसता कामा नये, या मागणीसाठी मनसे आग्रही आहे.
व्हिडीओला लाखो व्ह्यूज एकता ही रील स्टार आहे. तिच्या रील्स आणि व्हिडीओला लाखो व्ह्यूज आहेत. व्हिडीओ पाहूनच तिच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी वाढली. हेच येथील अन्य व्यावसायिकांना खुपल्याची चर्चा आहे.
साद घातली, पण तिला मदत मिळाली नाही शिंदेसेनेच्या शाखेत जाऊन तक्रार केली होती. मात्र, शाखेतून मदत मिळाली नाही. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, असे एकता सावंत हिने सांगितले.
फेरीवाल्यांचे स्टेशन परिसरात बिनधास्त बस्तान १. एकता सावंत हिचा स्टॉल हटविल्यानंतरही शनिवारी स्टेशन परिसरात इतर फेरीवाले मात्र बिनधास्तपणे बसले होते. २. सावंत हिच्याशी पत्रकार बोलत असताना तिथे फेरीवाल्यांनी गर्दी केली होती. काही फेरीवाल्यांनी मध्येच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. ३. तरुणीला स्टॉल लावू देणार असाल तर आम्हीही अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करतो. आम्हालाही स्टॉल दिला जावा, अशी मागणी केली.
Web Summary : MNS chief Raj Thackeray addresses the removal of a Marathi girl's food stall in Dombivli, despite alleged hafta payments. He plans to discuss the matter with municipal authorities following complaints of discrimination against local vendors.
Web Summary : मनसे प्रमुख राज ठाकरे ने डोंबिवली में एक मराठी लड़की के खाने के स्टॉल को हटाने का मुद्दा उठाया, कथित हफ्ता भुगतान के बावजूद। स्थानीय विक्रेताओं के खिलाफ भेदभाव की शिकायतों के बाद, उन्होंने नगरपालिका अधिकारियों के साथ इस मामले पर चर्चा करने की योजना बनाई है।