सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 08:22 IST2024-01-28T08:21:18+5:302024-01-28T08:22:03+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली.

सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका
भिवंडी - मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. भिवंडीतील एका कार्यक्रमाप्रसंगी आव्हाड यांनी ही टीका केली. जी गोष्ट सरकारच्या हातातच नाही त्याचे आश्वासन मराठा आंदोलकांना का दिले? ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान वाद लावण्याचे काम राज्य सरकारने केले. दंगे केल्याशिवाय राज्य सरकारला मते मिळणार नाहीत, अशी टीकादेखील आव्हाड यांनी केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. मात्र, राज्य सरकारच्या पक्षातील व मित्रपक्षातील एकाही मंत्र्याने अथवा खासदाराने संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला नाही, असेही आव्हाड म्हणाले.