शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खाजगीकरणातून मेक इन ठाणे

By admin | Updated: February 17, 2016 02:05 IST

मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्य करात अपेक्षेप्रमाणे १० टक्यांची वाढ करतांना, ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच वास्तववादी आणि लोकाभिमुख असा २०१६-१७ चा २५४९.८२ कोटींचा अर्थसंकल्प

ठाणे : मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्य करात अपेक्षेप्रमाणे १० टक्यांची वाढ करतांना, ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच वास्तववादी आणि लोकाभिमुख असा २०१६-१७ चा २५४९.८२ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. उत्पन्नाचा मर्यादित स्त्रोत विचारात घेता काही प्रकल्प पीपीपी, सामाजिक दायित्व, खाजगी लोकसहभाग आणि कन्स्ट्रक्शन टीडीआरचा आधार घेत पूर्ण केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.स्मार्ट सिटी, अमृत योजना यासाठी पालिकेच्या हिश्श्याची तरतूद करुन प्रथमच स्मार्ट मोबिलिटी, रोबोटिक मशीनद्वारे नाले आणि जलकुंभाची सफाई, नवीन मॉडेल रस्ते विकसित करणे, पाच नवीन पार्क, शहीद जवानांच्या वीरपत्नींसाठी आर्थिक मदत, आरोग्य सेवेचे संगणकीकरण, महिला व अपंगांसाठी विशेष योजना, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यावर भर, महापालिका शाळेतील मुलींसाठी स्वतंत्र शौचालये, रस्ता रुंदीकरण आणि नुतनीकरण, मिनी मॉल, इनलँड वॉटर ट्रान्स्पोर्ट (जेटी सुविधा), कृत्रिम प्रस्तरारोहण, सर्वांसाठी घरे योजना, संकारा नेत्रालय, मेडिटेशन व होलिस्टिक सेंटर, ज्येष्ठांचे नंदनवन, पक्ष्यांंसाठी कृत्रिम घरटी, पोलीस ठाणी बांधणे आदींसह विविध नवे प्रकल्प या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. गेल्यावर्षी मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ कर, मलनिस्सारण कर, पाणीपट्टीत वाढ केली होती. यंदा सलग दुसऱ्या वर्षी ठाणेकरांवर करवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या सामान्य करात १० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली असून ही करवाढ निवासी आणि बिगरनिवासी मालमत्ताधारकांना लागू असणार आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात मनपाचे उत्पन्न २०८६ कोटी, अनुदाने १७९.८६ कोटी, कर्ज ५३.८६ कोटी, आरंभीची शिल्लक २३०.१० कोटी हे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर महसुली खर्च १२५१.१८ कोटी, भांडवली खर्च (अ व क अंदाज) १००१.२८ कोटी भांडवली खर्च (जेएनएनयुआरएम) २९७.२१ कोटी आणि शिल्लक १५ लाख असा एकूण खर्च अपेक्षित धरला आहे.