शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : कल्याणचा बालेकिल्ला राखा, अन्यथा राजीनामे द्या, उद्धव ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 02:11 IST

भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.

- मुरलीधर भवारकल्याण/मुंबई : भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. आम्हाला ‘वरुण’ नव्हे की, ‘वरून’ही उमेदवार लादायचा नाही. उमेदवार खालूनच आला पाहिजे. पण, तो नक्की विजयी झाला पाहिजे, असे उद्गारही ठाकरे यांनी कल्याणच्या शिष्टमंडळाकडे काढले. त्यामुळे अखेर शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना ‘ए व बी’ फॉर्म देऊन मातोश्रीने माघारी धाडल्याने येथील पेच तूर्त सुटला आहे.बेलापूर मतदारसंघावरील दावा सोडताना शिवसेनेने कल्याण पश्चिम हा भाजपच्या नरेंद्र पवार यांच्याकडील मतदारसंघ खेचून घेतला. २००९ मधील निवडणुकीत माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे युती असतानाही भाजपच्या बंडखोरीमुळे पराभूत झाले होते, तर २०१४ मध्ये भाजप व शिवसेना समोरासमोर लढले आणि शिवसेनेतील धुसफुशीमुळे विजय साळवी यांचा पाडाव झाला. आपापसांतील हेव्यादाव्यांत एकतर बाहेरचा उमेदवार लादला जाऊ शकतो आणि पर्यायाने तिसऱ्यांदा मतदारसंघात पराभव झाला, तर पुन्हा भाजप त्यावर दावा करू शकतो, हे देवळेकर यांनी ओळखले. त्यांनी सर्व इच्छुकांना एकत्र करून एक पत्र तयार केले व शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी पत्र मिळताच बुधवारी दुपारी या सर्व शिवसैनिकांना चर्चेला बोलावले.

कल्याण पश्चिमची जागा आपण दोनवेळा गमावली. तरीही, कल्याण हा आपण शिवसेनेचा गड असल्याचा दावा करतो. तुमच्यात हेवेदावे सुरू असल्याने बाहेरून उमेदवार देण्याची चर्चा सुरू झाली. वरुण सरदेसाई याचे नाव तर मीडियाने चालवले. आमच्या मनात वरुण नव्हे की, वरूनही उमेदवार लादण्याचा विचार नव्हता व नाही. उमेदवार खालून शिवसैनिकांमधून आला पाहिजे. मात्र, आता तुम्ही एकमुखी मागणी केल्यानुसार भोईर यांना उमेदवारी दिल्यावर त्यांना विजयी करा. यावेळी पराभव झाला तर सगळ्यांचे राजीनामे मी घेईन, अशा शब्दांत उद्धव यांनी तंबी दिली.कल्याण पश्चिममध्ये भिवंडीतील प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू होते. त्यातच, मंगळवारी रात्रीपासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांचे नाव उमेदवारीकरिता चर्चेत आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. बाहेरील उमेदवार दिल्यास प्रचार करणार नाही, असा सूर आळवला जात होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-west-acकल्याण पश्चिमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे