शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : गणपत गायकवाड यांनी भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 01:19 IST

कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. जागावाटपात हा मतदारसंघ वाट्याला न आल्याने शिवसैनिक बंडाच्या पवित्र्यात असले तरी, गायकवाड यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी उपस्थिती लावली होती.गायकवाड हे याच मतदारसंघातून सलग दोनवेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गायकवाड यांनी पूर्वेतील तिसगावनाका येथून निवडणूक कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली. रॅलीमुळे कल्याण पूर्वत वाहतूककोंडी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.२०१४ मध्ये विरुद्ध, आता मात्र साथ-साथ२०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी १० उमेदवार रिंगणात होते. परंतु, प्रत्यक्षात लढत गायकवाड आणि लांडगे यांच्यातच झाली होती. यात गायकवाड यांनी अवघ्या ७४५ मतांनी लांडगे यांचा पराभव केला होता. दरम्यान, आता भाजपचे उमेदवार गायकवाड असून त्यांचा अर्ज भरण्यासाठी लांडगे यांनी उपस्थिती लावली होती.पाच जणांचे अर्ज : पूर्व मतदारसंघात आतापर्यंत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी बालाजी गायकवाड (अपक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) या दोघांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी गणपत गायकवाड (भाजप), सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक), अभिजित त्रिभुवन ( बहुजन मुक्ती पार्टी) यांनी अर्ज दाखल केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019