शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:16 IST

Maharashtra Election 2019: बदल की पुनरावृत्ती याकडे लक्ष; वाहतूककोंडी, पाणीप्रश्न समस्या

- मुरलीधर भवार कल्याण : ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याची सांगता होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. या मतदारसंघातील २७ गावे, वाहतूककोंडी, आरोग्याच्या समस्या आणि पाणीप्रश्न या मुद्द्याभोवती निवडणूक प्रचार दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार बदलला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध मनसेच्या लढाईत कोण विजयी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मतदारसंघात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावे, नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे, दिवा यांचा समावेश आहे. मतदारसंघातून केवळ दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे व मनसेतर्फे राजू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. या दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. निवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच मनसेचे उमेदवार पाटील यांनी भव्य असे निवडणुकीचे कार्यालय सुरू केले आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे यांनी त्याच धर्तीवर सागाव येथे प्रचाराचे कार्यालय सुरू केले. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी पाच वर्षांत मतदारसंघात कामे केली.

मात्र, शिवसेनेच्या म्हात्रे गटाकडून भोईर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी बदलून ती म्हात्रे यांना दिली. शिवसेनेतील बंडाळी पक्षाने शमवल्याने बंडखोरी टळली. तसेच भोईर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत म्हात्रे यांचे काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा आदेश व शिस्त पाळा, असे बजावून शिवसेनेचे उमेदवार म्हात्रे यांच्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन केले. प्रचारात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हात्रे यांनी भेटीगाठींवर विशेष भर दिला. तसेच त्यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली. मात्र, त्यांच्यासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकही प्रचारसभा झाली नाही.

महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा परवाच एक मेळावा पार पडला. तसेच कच्छी गुजराथी समाजाने घेतलेल्या मेळाव्यात भाजपचे राज्यसभा सदस्य आले. याशिवाय, शिवसेनेचे स्टार प्रचारक आदेश बांदेकर यांनी प्रचार केला. प्रचाराची सगळी सूत्रे ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहिली. म्हात्रे हे २५ वर्षे नगरसेवक आहेत. चार वेळा स्थायी समिती सभापती होते. त्यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून पराभव झाला होता. तेव्हाच्या चुका त्यांनी आता सुधारल्या आहेत.

दुसरीकडे मनसेचे उमेदवार पाटील यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर जास्त जोर दिला. पाटील हे २००९ मध्ये जि.प.वर बिनविरोध निवडून आले होते.२०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजनही त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीएनसी ग्राउंडवर प्रचारसभा घेतली. त्यात रस्ते, वाहतूककोंडी या मुद्द्यांवर प्रहार केला.

तसेच रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या प्रमुख सोयीसुविधा देऊ शकत नाहीत. त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांवर मनसे निवडणूक लढवत आहे. तर, म्हात्रे हे मतदारसंघात भोईर यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याच्या जोरावर निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या पाठीशी सत्तेतील शिवसेना-भाजप हे पक्ष आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर २००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रथम निवडणूक पार पडली. त्यावेळी पाटील यांचे बंधू रमेश पाटील हे मनसेतर्फे निवडून आले होते. पाच वर्षे हा मतदारसंघ मनसेच्या ताब्यात होता. त्यानंतर, २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले. या मतदारसंघात मतदारांनी बदल घडवला आहे. बदलाची पुनरावृत्ती होणार की, शिवसेना विजयाची परंपरा कायम राखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२७ गावांचा विकास, नगरपालिकेचे आश्वासन

म्हात्रे यांच्या जाहीरनाम्यात २७ गावे विकसित करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तर, पाटील यांच्या जाहीरनाम्यात २७ गावांची वेगळी नगरपालिका हा मुद्दा आहे. तसेच दोघांनीही दिवा डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सामायिक आश्वासन दिले आहे. मतदार कोणाला झुकते माप देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-rural-acकल्याण ग्रामीण