Mahanagar gas line bursts east of Bhayander | भाईंदर पूर्वेला महानगर गॅसची लाईन फुटली; कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतली, अन्यथा...

भाईंदर पूर्वेला महानगर गॅसची लाईन फुटली; कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतली, अन्यथा...

मीरारोड - महापालिका व ठेकेदाराच्या बेजबाबदारपणा मुळे सिमेंट रस्त्याच्या कामाचे खोदकाम दरम्यान महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी भाईंदर पूर्वेला घडली आहे . 

भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुल ते फेमिली केअर रुग्णालय पर्यंतच्या रस्त्याचे नव्याने काम सुरु आहे . सदर रस्ता सिमेंटचा बनवला जात असून त्यासाठी खोदकाम केले जात आहे . गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जेसीबीने खोदकाम करताना तेथून घरगुती गॅस पुरवठा करणारी महानगर गॅस ची पाईप लाईन फुटली . गॅस लाईन  फुटताच गॅस गळती व धूर सारखे हवेत पसरले . याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या व त्यांनी पाण्याचा मारा करून महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गॅस गळती थांबवली . खबरदारीसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. 

Web Title: Mahanagar gas line bursts east of Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.