Loss of paddy in the field; Farmers in the district are worried | भिवंडीत भातशेतीचे नुकसान; तालुक्यातील शेतकरी चिंतातुर

भिवंडीत भातशेतीचे नुकसान; तालुक्यातील शेतकरी चिंतातुर

- नितीन पंडित 

भिवंडी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील तीन हजार हेक्टर हळव्या भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात आले असून ते पीक पूर्णत: तयार झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी भातपिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी लगबग सुरू केली आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी पाच दिवसांपासून हळव्या भाताची कापणी केली. मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे शेतामधील पाण्यात तरंगू लागली आहेत. रिमझिम पडणारा पाऊस आणखी काही दिवस असाच सुरू राहिल्यास भाताच्या कणसांना मोड येऊन पिकाची नासाडी होणार आहे. त्यामुळे शेतकºयांवर खावटीचे संकट निर्माण होणार आहे. तर, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, यामध्ये शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी उत्तम पावसामुळे शेतात सोन्यासारखे भाताचे पीक आले होते. बळीराजा आनंदित होता. मात्र, परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगाव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगाव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबाव, पाये, पायगाव, खार्र्डी, एकसाल, सागाव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालिवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांसह तालुक्यातील अन्य शेतकºयांनी तयार झालेल्या हळव्या भातपिकाची कापणी सुरू केली आहे. दोन दिवसांपासून वरुणराजाची बळीराजावर अवकृपा झाल्याने शेतात सर्वत्र पाणीचपाणी साचले आहे. त्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे पाण्यावर तरंगल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला, तर २०१७ प्रमाणेच शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळीराजा आणखी कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची लगबग असल्याने महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. यामुळे शेतीचे पंचनामे सध्या तरी होणे शक्य नसल्याने शेतकºयांवर आणखी एक संकट ओढवले आहे.

दरम्यान, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रि या संपताच सरकारी आदेशानुसार नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतकºयांना अधिकाधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रि या तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे.भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयाला हेक्टरी २५ हजारांची मदत उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी खानिवली ग्रुप विविध शेतकरी कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण रामचंद्र वारघडे यांनी केली आहे .

शेती हेच उत्पन्नाचे साधन

मुरबाड : पावसामुळे मुरबाड तालुक्यासह म्हसा परिसरात अचानक झालेल्या पावसाने भातपिकाचे नुकसान झाले आहे.हलवार जातीचे पीक हे लवकर तयार होणारे आहे. मधल्या काळात पावसानेही विश्रांती घेतली होती. त्यामुळे तयार झालेले पीक कापण्यास शेतकºयांनी सुरुवात केली होती. आज कापलेले पीक उन्हात सुकल्यानंतर साधारणपणे दुसºया दिवशी घरात किंवा खळ्यात साठवले जाते. परंतु, शनिवारी दुपारी म्हसा पंचक्र ोशीत अचानक मुसळधार पाऊस झाल्याने कापलेले सर्व पीक भिजून गेल्याने कापलेल्या भाताचे नुकसान झाले. शेती हेच उत्पनाचे साधन असल्याने पावसाच्या या लहरीपणामुळे नुकसान होत आहे.

Web Title: Loss of paddy in the field; Farmers in the district are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.