शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी कंपनीच्या जागेवर उभे राहणार लॉजिस्टिक पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक ...

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार असल्याची माहिती अदानी कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली. कामगार संघटनांचा थकीत देण्यांचा अडीच हजार रुपयांचा दावाही कंपनीने फेटाळून लावला असून, कामगारांच्या देण्यापोटी १०४ कोटी राष्ट्रीय लवादाकडे भरल्याचे सांगितले.

एनआरसी कंपनीच्या जुन्या व्यवस्थापनाने ४४० एकर जागेपैकी १०३ एकर जागा रहेजा बिल्डरला विकली होती. हा विक्री व्यवहार न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर कंपनी लिलावात विकण्यास काढली असता अदानी यांच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली. जुन्या व्यवस्थापनासोबत रहेजांचा व्यवहार झाला हाेता. आता अदानी रहेजा यांच्यासोबत सेटलमेंट करून त्याची माहिती न्यायालयात देणार असे ठरले आहे. अदानीने कंपनीची जागा लिलावात घेतल्याने त्यांना जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनी कायद्यानुसार, राष्ट्रीय लवादाच्या आदेशानुसार कामगारांची देणी देण्यासाठी ३२ कोटी रुपये भरण्याची तयारी अदानी कंपनीने दाखविली आहे. मात्र, इतक्या रकमेत कामगारांची देणी भागणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाल्याने अदानीने कामगारांच्या देण्यापोटी लवादाकडे १०४ कोटी रुपये भरले आहेत. ही रक्कम भरल्यापासून ४५ दिवसांत धनादेशाद्वारे कामगारांना वाटप करण्याचा आदेश दिलेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाच हजार कामगारांपैकी ६५० कामगारांनी धनादेश स्वीकारले आहेत. जवळपास १४ कोटी ५० लाख रुपये कामगारांना वितरित केले आहेत. ज्या वर्षी कंपनी बंद झाली, त्या वर्षाचा पगार थकबाकी म्हणून दिला जातो. कंपनी १० वर्षे बंद असल्याने बंद काळातील पगार थकबाकीच्या स्वरूपात दिला जाऊ शकत नाही. कारण त्या काळात उत्पादन बंद होते, असे अदानी कंपनीचे म्हणणे असून, त्यामुळे १०४ कोटींची रक्कम कामगारांची देणी देण्यासाठी पुरेशी आहे, असा अदानी कंपनीचा दावा आहे. कामगार संघटनांच्या दाव्यानुसार अडीच हजार कोटी रुपयांची थकीत देणी देण्याचा विचार व्यवहार्य नाही, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

जुन्या जीर्ण झालेल्या कामगार वसाहतीमधील घरे तोडण्यास लवादाकडून स्थगिती आदेश नसल्याने सध्या सुरू केलेली पाडकाम कारवाई कामगार विरोधी नसल्याचे अदानी यांचे म्हणणे आहे. एनआरसी कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. बँकांचे कर्ज, कामगार आणि कर्मचाऱ्यांची देणी, केडीएमसीचा थकलेला मालमत्ता कर, आदी मिळून जवळपास ३०० कोटी रुपयांची देणी अदानी कंपनी चुकती करणार आहे.

फोटो-कल्याण-एनआरसी

-----------------------