लोकलच्या धडकेत चिमुकल्यासह मातेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 18:51 IST2019-02-03T18:48:33+5:302019-02-03T18:51:30+5:30
कोपर पचिमकडून पूर्व बाजुकडे रेल्वे रुळ ओलांडताना 3 व 4 नंबर ट्रॅकच्या मध्ये हा अपघात झाला.

लोकलच्या धडकेत चिमुकल्यासह मातेचा मृत्यू
डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना लोकलची धडक बसल्याने तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये दोन वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे.
कोपर पचिमकडून पूर्व बाजुकडे रेल्वे रुळ ओलांडताना 3 व 4 नंबर ट्रॅकच्या मध्ये हा अपघात झाला. लोकल की रेल्वे याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही लोकलची धडक बसल्याचे समजते.
मृतांमध्ये प्रिती उदय राणे (वय 26, कोळसेवाडी कल्याण पूर्व), लिवेश उदय राणे (वय 2), सुनिता घनराज भंगाले (वय 62) यांचा समावेश आहे. तर भास्कर चंदु राणे (वय 62) हे गंभीर जखमी झाले.