शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

दुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 3:21 AM

एसआयए शाळेतील विद्यार्थी : चिंचवडजवळ गाडीतून पडून झाला मृत्यू; मामाला अपघाताची गंधवार्ता नव्हती

निलेश धोपेश्वरकर ।डोंबिवली : मला एकदा तरी दुरंतो गाडीतून प्रवास करायचा आहे, ही त्याची इच्छा मामाने पूर्ण केली. पण, ती अखेरची ठरेल, असे कुणालाही वाटले नव्हते. डोंबिवली पश्चिमेत राहणारा अर्जुन रमेश राव (१३) हा मुलगा हैदराबादहून मामासोबत येताना बुधवारी सकाळी दुरंतोमधून पडून त्याचे निधन झाले. अर्जुनचा मृत्यू त्याच्या शिक्षकांना चटका लावून गेला. गुरुवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.साउथ इंडियन शाळेत शिकणारा अर्जुन हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. सातवीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आठवीत गेला होता. शिष्यवृत्ती परीक्षेतही त्याने दुसरा क्रमांक मिळवला होता. शाळेच्या कामामध्ये तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. शाळेत होणाऱ्या आर्मी प्रशिक्षणातही अर्जुन सहभागी होता. त्याच्या मृत्यूची बातमी शाळेत येताच शिक्षकांना धक्का बसला. तो आपल्या मामासोबत हैदराबादला मामेबहिणीकडे गेला होता. अर्जुन पहिल्यांदाच आईवडिलांना सोडून बाहेर गेला होता. दुरंतोमधून प्रवास करायची इच्छा होती, म्हणून मामाने या गाडीचे तिकीट काढले होते. बुधवारी सकाळी स्वच्छतागृहात जातो, असे सांगून तो गेला. पण, त्याचवेळी गाडीच्या दारातून पडून अर्जुनचा मृत्यू झाला. बराचवेळ झाला अर्जुन आला का नाही, म्हणून मामा संपूर्ण गाडीत त्याचा शोध घेत होते. अर्जुनचा मृतदेह चिंचवडच्या पोलिसांना रेल्वेमार्गात सापडला. त्याच्या पॅण्टच्या खिशात वडिलांचे व्हिजिटिंगकार्ड मिळाले. त्यावर असलेल्या फोनवर संपर्क साधून पोलिसांनी वडिलांना अर्जुनच्या मृत्यूची बातमी दिली. वडिलांनी तातडीने गाडीत असलेल्या त्याच्या मामाला हे कळवले.अर्जुनचा मृतदेह बुधवारी रात्री त्याच्या घरी आणण्यात आला. तेव्हा आईवडिलांच्या भावनांचा बांध फुटला. अर्जुन हा एकुलता एक आणि बºयाच वर्षांनी झाला होता. अर्जुनचा मृतदेह घरी आणेपर्यंत तो जिवंत असेल, अशी भाबडी आशा त्याच्या आईला होती. पण, ती फोल ठरली. गुरुवारी सकाळी शिक्षिका अंत्यदर्शनासाठी गेल्या असता, ‘अर्जुन आता तरी ऊठ, बघ शिक्षिका आल्या आहेत’, असे त्याची आई वारंवार म्हणत होती. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.आई, माझी पुस्तके आणली का?अर्जुनच्या आईने दोनच दिवसांपूर्वी शाळेतून आठवीची पुस्तके आणली होती. प्रवासातून त्याने आईला फोन करून नवीन पुस्तके आणली का, असे विचारले तेव्हा थोडी पुस्तके आणली आहेत, बाकी नंतर आणेन, असे उत्तर दिले. मी आल्यावर नवीन पुस्तके बघेन, असे तोम्हणाला. पण त्यापूर्वीच काळाने घाला घातला.

टॅग्स :Accidentअपघात