मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन दगडी मातीचा ढिग रस्तावर पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:29 PM2020-08-08T20:29:08+5:302020-08-08T20:29:27+5:30

कळवा पोलिस स्थानकाजवळील वास्तु आनंद सोसायटीत एक झाड सहा मोटरसायकलवर पडले. तर लोकमान्य नगर येथे झाडाची फांदी व वीज पुरवठ्याची तार घरावर पडली.

A landslide on the Mumbra Bypass Highway and a mound of mud on the road | मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन दगडी मातीचा ढिग रस्तावर पडला

मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन दगडी मातीचा ढिग रस्तावर पडला

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात एक आगीच्या घटनेसह दोन झाडे पडली, दोन झाडे धोकादायक स्थितीत आहेत. अन्य तीन किरकोळ घटना घडल्या आहेत.

 ठाणे : जिल्ह्यात सरासरी अवघा 10 मिमी पाऊस पडला. यातील सर्वाधिक ठाणे महापालिका परिसरात फक्त 15 मिमी पाऊस पडला आहे. दरम्यान येथील लोकमान्य नगरमध्ये वीजेची तार व झाडांची फांदी घरावर पडली. सुदैवाने जीवित हानी नाही. मात्र या दरम्यान उल्हासनगरला सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. तर मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन दगडी मातीचा ढिग रस्तावर पडला आहे. धरण परिसरात आज पाऊस पडला नाही.

            

जिल्ह्यात ठिकठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या. दरम्यान कळवा पोलिस स्थानकाजवळील वास्तु आनंद सोसायटीत एक झाड सहा मोटरसायकलवर पडले. तर लोकमान्य नगर येथे झाडाची फांदी व वीज पुरवठ्याची तार घरावर पडली. याप्रमाणेच मुंब्रा बायपास महामार्गावर भूस्खलन होऊन रस्तांवर दगडी व मातीचा ढिग पडला. यामुळे या महामार्गावर वाहतूक मंदावली आहे. याप्रमाणेच शहरात एक आगीच्या घटनेसह दोन झाडे पडली, दोन झाडे धोकादायक स्थितीत आहेत. अन्य तीन किरकोळ घटना घडल्या आहेत.
           

जिल्ह्यात सरासरी अवघा १०.२ मिमी पाऊस पडला. यामध्ये ठाणे तालुक्यात फक्त १५.४८ तर कल्याणला १२.१, मुरबाड 1२.८, भिवंडीला ८.५, शहापूरला ८.१, उल्हासनगर १२.८ आणि अंबरनाथला १४.५ मिमी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. बारवी धरणात फक्त ३४ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील पाणलोट क्षेत्र खानिवरे, कान्होळ, पाटोळ या ठिकाणी ही अत्यंत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी ६५.८५ घनमीटर असून ५४ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९८.९२ टक्के होता. आंध्रा धरणात अवघा २४ मिमी, भातसा अवघा 32 मिमी,  तर मोडक सागरमध्ये 23, तानसात १०मिमी, मध्यवैतरणात ३५ मिमी पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कमी राहिला तर लवकरच पाणी कपातीला ठाणे, मुंबईकरांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

 

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

 

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

Web Title: A landslide on the Mumbra Bypass Highway and a mound of mud on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.