शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

ठाणे : नौपाडा भागातील घंटाळी देवी परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय भाजी विक्रेत्याच्या घरात अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास प्रवेश ...

ठाणे : नौपाडा भागातील घंटाळी देवी परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय भाजी विक्रेत्याच्या घरात अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ ते २३ जूनच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी आता नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.

-----------------------------------

अपघातात मुलगा जखमी

ठाणे : राबोडी भागात राहणारे फिर्यादी यांचा मुलगा रस्ता ओलांडत असताना ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वराने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात ३० एप्रिल रोजी घडला असून त्याची तक्रार आता कळवा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------------

कारची काच फोडून लॅपटॉप चोरीला

ठाणे : कासारवडली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघबीळनाका येथे फिर्यादीने पार्क करून ठेवलेल्या कारमधून चालकाच्या बाजूची काच फोडून अज्ञात चोरोने कारमधील लॅपटॉप आणि व बॅग चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २२ जून रोजी रात्री ९ च्या नंतर घडली असून या प्रकरणी आता कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----------------------

मोबाइल टॉवरवरील साहित्य चोरीला

ठाणे : कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर भागात फिर्यादी यांच्या देखरेखीखाली असलेल्या मोबाइल टॉवरवरील खासगी कंपन्याच्या ए.बी. कार्ड अज्ञात चोरोने चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदराचा ७० हजारांचा मुद्देमाल लंपास झाला असून या प्रकरणी आता कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------------------------------------