शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्यांची संख्या वाढण्याची लोणकढी थाप

By admin | Updated: March 25, 2017 01:24 IST

ठामपामधील स्वीकृत सदस्यपदांकडे डोळे लावून बसलेल्या पराभूत, माजी नगरसेवकांना सध्या या पदांची संख्या पाचवरून वाढून

ठाणे : ठामपामधील स्वीकृत सदस्यपदांकडे डोळे लावून बसलेल्या पराभूत, माजी नगरसेवकांना सध्या या पदांची संख्या पाचवरून वाढून १० केली जाणार असल्याचे गाजर दाखवले जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा ‘स्वीकृतचा गाजरहलवा’ मुखात पडेल, या आशेवर असलेल्यांचा भ्रमनिरास होणार आहे. कारण, असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे नगरविकास विभागाच्या उच्चपदस्थांनी स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेने प्रथमच एकहाती सत्ता संपादित केली आहे. त्यांना ६७ जागांवर यश मिळाले आहे. परंतु, स्थायीची गणिते जुळवण्यासाठी त्यांना काँग्रेसचा ‘हात’ हाती घ्यावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थायीबरोबर स्वीकृतची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. स्वीकृत सदस्यांची निवड केव्हा होणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, स्वीकृत सदस्यांमध्ये काँग्रेसला वाटेकरी करून घेण्याच्या निर्णयामुळे सेनेतील पराभूत व माजी नगरसेवक नाराज आहेत. (प्रतिनिधी)